सध्या वर्कआउट करणे हा एक तरुणींमधला ट्रेंड झाला आहे. प्रत्येकालाच जीममध्ये जावून वर्कआउट करून तो सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट करायला आवडतो. त्यासाठी काही जण हेवी वर्कआउट करतात. पण हे वर्कआउट प्रत्येकाने करण्यासाठी नसतात हे त्यांना फार उशीरा कळतं. फीट राहण्यासाठी रोज व्यायाम करणे महत्वाचे असते. मात्र काही दिवसांत अशी प्रकरणे घडत की, वर्कआउट केल्यानंतर मुत्यू होत आहे. ही समस्या फार गंभीर आहे.
व्यायामात आपण सगळ्या अवयवांचा समावेश करतो. त्यात जर गल्लत झाली तर तुम्हाला नकोत्या समस्येला सामोरे जावे लागते. व्यायामुळे बहुतेक ह्दयावर आलेला दबाव चांगला असतो. ज्या व्यक्तींच्या शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त असते त्यांनी व्यायाम केला तर, त्यांच्या ह्रदयाची धडधड वेगाने व्हायला लागते. तसेच रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना ह्रदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, डॉक्टर दररोज व्यायाम करावा यावर भर देतात परंतु खूप कठीण व्यायाम शरीरासाठी चांगला नाही.
कोणत्या व्यक्तींना हेवी व्यायामामुळे धोका निर्माण आहे?
ह्रदयरोग, उच्च कोलेस्ट्रॉल, रक्तदाब असलेल्यांनी आणि विस्कळीत जीवनशैली असणाऱ्यांनी व्यायामादरम्यान काही गोष्टींचे पालन केले पाहिजे. त्यात खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींचा समावेश मोठ्या प्रमाणात होतो. हा धोका तेव्हाच उद्भवतो जेव्हा तुम्ही जास्त व्यायाम करता. त्यात हेवी व्यायाम करता.
ह्दय निरोगी ठेवण्यासाठी किती तास व्यायाम करावा?
तज्ज्ञांच्या मते आठवड्यातून १५० मिनिटांच्या वेगाने व्यायाम करावा. म्हणजेच दिवसातून ७५ मिनिटे व्यायाम करावा.
व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी?
व्यायाम सुरू करण्यापूर्वी 5-10 मिनिटे हलका स्ट्रेचिंग आणि वॉर्म-अप करा. डिहायड्रेशन टाळण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने पाणी घ्या. स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त ताण देऊ नका. दम लागत असेल, चक्कर येत असेल किंवा वेदना होत असतील तर व्यायाम थांबवा. कोणत्याही व्यायामात श्वास रोखू नका. नवशिक्या असाल तर ट्रेनर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या. व्यायाम करताना योग्य फॉर्म आणि पोश्चर वापरा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.