health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips: सावधान! तरुणांमध्येही वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; 'या' चुका चुकूनही करु नका, तज्ञांनी दिल्यात खास टिप्स...

तज्ञांच्या मते, थंडीच्या दिवसात वृद्धांमध्ये ह्रदयविकाराचा धोका वाढतो. मात्र आता हे प्रमाण तरुणांमध्येही वाढताना दिसत आहे. नवी दिल्लीचे वरिष्ठ ह्रदयरोगतज्ञ यांनी याबद्दल महत्वाच्या सुचना दिल्या आहेत.

Gangappa Pujari

Health Tips: देशभरात सध्या मोठ्या प्रमाणावर थंडीची लाट पसरली आहे. उत्तर भारतात थंडीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळेच हाड गोठवणाऱ्या थंडीचा नागरिकांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होताना दिसत आहे. या थंडीचा सर्वाधिक धोका हा ह्रदविकाराशी लढा देणाऱ्या लोकांना आहे. त्याचबरोबर या थंडीमुळे ह्रदयविकाराचा धोकाही वाढला आहे . थंडीमुळे ह्रदयविकाराचा झटका येवून एकाचदिवशी २५ जणांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे.

त्यामुळेच थंडीमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पाहूया याबद्दलच्या काही खास टिप्स. (Health Tips)

तज्ञांच्या मते, थंडीच्या दिवसात वृद्धांमध्ये ह्रदयविकाराचा धोका वाढतो. मात्र आता हे प्रमाण तरुणांमध्येही वाढताना दिसत आहे. नवी दिल्लीचे वरिष्ठ ह्रदयरोगतज्ञ यांनी याबद्दल महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार..

1. हिवाळ्यात ह्रदयविकाराचा धोका असणाऱ्या व्यक्तींनी किंवा आजारी व्यक्तींनी सुर्योदयापुर्वी मॉर्निंग वॉकला जाणे टाळावे.

2. हिवाळ्यात शक्यतो घरातूनच व्यायाम करण्याचा प्रयत्न करावा, सकाळी सकाळी बाहेर जाणे टाळावे.

3. हिवाळ्यामध्ये जास्तीत जास्त कपडे परिधान करावेत.

4. हिवाळ्यात डोक्यातून उष्णता कमी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बाहेर जाण्यापूर्वी डोके व्यवस्थित झाकून घ्यावे.

5. धमन्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन ह्रदयविकाराचा (Heart Attack) झटका येवू शकतो. यामुळे सावधगिरी म्हणून हिवाळ्यात ड जिवनसत्वाला पुरक असा आहार घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

Working Hours Proposal: नोकरदारांना मोठा धक्का? आता 8 नाही 10 तास काम?

SCROLL FOR NEXT