आजकालच्या बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे अनेक गंभीर आजारांचा त्रास उद्भवतो. फास्ट फूड, उशिरा जेवण आणि व्यायामाच्या अभावामुळे शरीरात बरेच बदल होतात. तसेच लठ्ठपणामुळे डायबिटीस किंवा बॅड कोलेस्टेरॉलचं धोका वाढतो. यामुळे ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील वाढते. सध्या तरूणांमध्ये हार्ट अटॅक आणि हार्ट स्ट्रोकचा धोका वाढत चालला आहे. हा धोका टाळण्यासाठी वेळीच आहारात बदल करणे गरजेचं आहे.
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आहारात काही मसाल्यांचा समावेश करा. स्वयंपाक करताना आपण मसाल्यांचा वापर करतो. मसाल्यांमुळे पदार्थाची चव वाढते. जेवण रूचकर लागते. आपल्याला जर कोलेस्टेरॉल नियंत्रणात आणायची असेल तर, आहारात ३ मसाल्यांचा समावेश करा. या मसाल्यांमुळे नसांमध्ये साचलेला घातक चरबीचा थर कमी होईल.
लसूण
बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसणाचा आहारात समावेश करा. लसूणमधील अॅलिसिन हे घटक ब्लड प्रेशर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. बॅड कोलेस्टोरॉल कमी करण्यासाठी सकाळी १-२ कच्चे लसणाचे पाकळ्या खा. यामुळे नसांमध्ये साचलेले बॅड कोलेस्टेरॉल कमी होईल, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढेल.
हळद
हळदीमध्ये करक्यूमिन असते. जे नसांमधील चिकट थर कमी करण्यास मदत करते. आपण हळद दूध, भाज्यांमध्ये हळद घालून खाऊ शकता
दालचिनी
दालचिनी शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. दालचिनीतील ट्रायग्लिसराइड्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी कोमट पाण्यात अर्धा चमचा दालचिनी मिसळून प्या. यामुळे पचन सुधारते. तसेच वजन कमी करण्यास मदत करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.