बदलत्या ऋतुमुळे आपल्या शरीरावर अनेक परिणाम होतात. त्यातच हिवाळा ऋतु सुरु झाला कि अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते कारण हिवाळ्यातल्या थंडीचा परिणाम आपल्या आरोग्यावर अधिक होतो. अशातच हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याची शक्यताही अधिक वाढते. आपले हृदय न थांबता काम करत असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या हृदयावर होत असतो.
आजारी पडल्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होत नाही त्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि हार्ट अटॅकची शक्यता वाढते. गेल्या वीस वर्षांमध्ये हार्ट अटॅकने मृत्यु पावणाऱ्यांच्या संख्येमध्ये ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच दरवर्षी २ कोटी लोकांचा मृत्यु हार्ट अटॅकने होतो. यात तरुणांची संख्या अधिक आहे.
हिवाळा ऋतुमध्ये शारीरीक हालचालींचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकिच्या सवयी आणि व्हायरल इन्फेक्शन यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्यामुळे हिवाळ्यात हृदयाची अधिक काळजी घेतली पाहिजे. थंडी वाढली की रक्तवाहिन्यावर दबाव येतो आणि रक्तवाहिन्या आंकुचन पावतात. त्यामुळे बल्ड प्रेशर वाढते आणि हृदयावर ताण येतो. गेल्या काही वर्षात हार्ट अटॅकने मृत्यु पावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यातच तरुणांमध्ये कमी वयात हार्ट अटॅकने मृत्यु पावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
यासाठी खबरदारी म्हणून धूम्रपान आणि मद्यपान यांचे सेवन करणे टाळावे. त्यातच दररोज या गोष्टींचे सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होतात आणि हृदयविकार होण्याची शक्यता अधिक वाढते. हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका वाढतो कारण रक्तवाहिन्यांवर दबाव येऊन ते आंकुचन पावतात आणि शरीरातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे रक्तदबाव वाढतो आणि हृदयावर दबाव येतो. लठ्ठपणा, उच्च रक्तदाब ब्लड प्रेशर, डायबिटीज, संधिवात आणि युरिक अॅसिडमध्ये वाढ हे हृदयासाठी धोकादायक आहे. यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
रक्तदाब आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्येपासून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करा. बाहेरचे जंक फूड खाणे बंद करा. तसेच प्रिर्जवेटीव आणि इन्सटंट फूड म्हणजेच अन्नाचे कमी सेवन करावे. त्या ऐवजी आहारात हेल्दी आणि पोषक तत्वाने भरपूर असलेल्या गोष्टींचे दररोज सेवन करा. आणि वेळेवर जेवण करा.
जवस, दालचिनी, लसून आणि हळद सारख्या गोष्टींचा जास्तीत जास्त आहारात समावेश करा. भरपूर पाणी प्या. शरीराला आवश्यक ७ ते ८ तासांची चांगली झोप घ्या. शरीराला आणि मानसिक आरोग्याला ताणतणावापासून शक्यतो दूर ठेवा.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Edited by: Priyanka Mundinkeri