तुम्हाला माहित आहे का शरीराला एनर्जेटीक ठेवण्यासाठी अनेक बीया उपयोगी असतात. यामध्येच सुर्यफुलाच्या बीया तीतक्याच फायदेशीर मानल्या जातात. शरीराला पोषण आणि ऊर्जा देण्याच्या बाबतीत सनफ्लॉवर सीड्स अतिशय फायदेशीर आहेत. चिकन आणि मटनपेक्षाही या बियांमध्ये अधिक ताकद असल्याचे मानले जाते. या बियांचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत, ते जाणून घ्या. या बिया तुम्ही रोजच्या आहारात सामिल करु शकता.
सनफ्लॉवर सीड्समध्ये व्हिटॅमिन बी६ भरपूर प्रमाणात असते. हे तत्त्व मज्जासंस्थेचे कार्य सुधारण्यास आणि पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. तसेच विकरे आणि हार्मोन्सच्या निर्मितीमध्येही ते उपयुक्त ठरते. बिया भिजवून खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन बी६ पूर्णपणे मिळते.
त्वचेवर सुरकुत्या पडण्यापासून रोखण्यासाठी आणि दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी व्हिटॅमिन ई गरजेचे असते. बदाममध्ये २८ मिलिग्रॅम व्हिटॅमिन ई असते, तर सुर्यफुलाच्या बियांमध्ये ३५ मिलिग्रॅमपर्यंत आढळते. त्यामुळे रोज या बियांचे सेवन केल्यास शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ई मिळते.
शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजांपैकी मॅग्नेशियम एक आहे. आजकाल अनेकांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता दिसून येते. सुर्यफुलाच्या बिया या खनिजाची कमतरता भरून काढण्यासाठी उत्तम स्त्रोत मानल्या जातात.
या बिया सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या रात्रभर भिजवून खाणे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर सर्व पोषक घटक सहज शोषून घेते. प्रवासात किंवा घाईत असताना भाजलेल्या बियांचे सेवनही करता येते. ज्यांना वजन वाढवायचे आहे, ते रोज २५ ते ४० ग्रॅमपर्यंत या बिया खाऊ शकतात.