Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : लग्नानंतर पत्नीबद्दल 'या' गोष्टी कधीच कुणाला सांगू नका; संसारात येईल मोठं वादळ

Ruchika Jadhav

प्रत्येक व्यक्ती आपल्या पत्नीवर आणि पत्नी आपल्या पतीवर प्रेम करते. आपला संसार सुखाचा व्हावा आणि छान असावा असं प्रत्येकाला वाटतं. मात्र घर म्हटलं तर तिथे वाद आलेच. कुटुंबात प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे असतात. अशात पती-पत्नीमध्ये असलेलं प्रमे आणि या दोन्ही गोष्टी खाजगी असतात.

अनेकदा पती पत्नीच्या नात्यात दुरावा येतो, वाद होतात, मोठी भांडणे होतात मात्र म्हणजे यामुळे दोघांचंही एकमेकांवरील प्रेम कमी झालेलं नसतं. या काळात पती आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांजवळ आपलं मन मोकळं करतो. मात्र असे करताना तो नकळतपणे आपल्यासाठी संकटांना आमंत्रण देत असतो. पत्नी बद्दल बाहेर काहीही सांगितल्यास त्याने संसारावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे पतीने पत्नीबद्दल कोणत्या गोष्टी सांगणे चूक आहे याची माहिती सांगणार आहोत.

आर्थिक समस्या

आर्थिक समस्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतात. सध्या प्रत्येक कुटुंबात पती आणि पत्नी दोघेही पैसे कमवतात. करिअरमध्ये काही वेळा बऱ्याच अडचणी येतात. अशात तुमची पत्नी आर्थिक अडचणीत असेल तर तिला समजून घ्या आणि करिअरसाठी वेळ द्या. अशावेळी तुम्ही मित्रांना किंवा अन्य कुणालाही तुमच्या आर्थिक परिस्थिती बद्दल सांगणे चूक आहे.

शारीरिक संबंध

शारीरिक संबंध हा प्रत्येक जोडप्यातील खासगी विषय आहे. याबद्दल कोणत्याही जवळच्या मित्राला सांगू नये. असे सांगितल्याने त्या व्यक्तीचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलतो. त्यामुळे चुकूनही याबद्दल बाहेर काही सांगू नका.

भांडणे

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक पास्ट असतो. नात्यात पास्ट असला की त्यावरून वाद भांडणे होतात. या गोष्टींवर पती पत्नीने एकमेकांचा विश्वास जिंकणे महत्वाचे असते. त्यासाठी शांततेने या विषयावर बोललं पाहिजे. मात्र अनेक कपल्स यावरू वाद करतात. अशा विषयांवर तुमचेही वाद होत असतील पत्नीबद्दल बाहेरच्या व्यक्तींना काहीही सांगू नका.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Corporation : बिना परवाना बॅनर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल; धुळे महापालिकेची कारवाई

Navratri Kanya Pujan: कन्या पूजन करताना 'या' विशेष गोष्टींची काळजी घ्यावी...

Maharashtra News Live Updates: अबु सालेमच्या भेटीसाठी आलेले दोघे एटीएसच्या ताब्यात

Wildlife : सिंहाची पिल्लं नेमकी कधी वयात येतात? जाणून घ्या जंगलाच्या राजाची रंजक माहिती

Katrina Kaif: कतरिनाला झाला मधुमेहाचा आजार? दंडावरील पॅचमुळे चाहत्यांमध्ये चर्चा, पाहा Video

SCROLL FOR NEXT