Children Health SAAM TV
लाईफस्टाईल

Children Health : हडकुळी मुलं होतील धष्टपुष्ट, रोज सकाळी खा 'हा' पौष्टीक लाडू

Healthy Ladoo for Strong Bones : सतत खाऊनही तुमची मुलं तब्येतीने हडकुळी असतील तर, रोज सकाळच्या नाश्त्याला मुलांना 'हे' दोन प्रकारचे लाडू खायला द्या.

Shreya Maskar

लहान वयात पालकांनी मुलांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे असते. लहान वयात हाडांना मजबूत करण्यासाठी मुलांच्या आहारात कॅल्शियम, फॉस्फरस, खनिजे, फायबर आणि व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असणे गरजेचे आहे. लहान मुलांना हे सर्व पोषक घटक एका पदार्थांपासून मिळू शकतात. चला तर मग मुलांना आवडतील असे पौष्टिक लाडूची रेसिपी जाणून घेऊयात.

भोपळ्याच्या बियांचे लाडू

साहित्य

  • पांढरे तीळ

  • अळशी

  • तूप

  • ड्रायफ्रूट्स

  • भोपळ्याच्या बिया

  • सुकं खोबरं

  • गूळ

  • खजूर

कृती

भोपळ्याच्या बियांचे लाडू बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मंद आचेवर पांढरे तीळ आणि अळशीच्या बिया, सुकामेवा, सुक खोबरं आणि भोपळ्याच्या बिया भाजून घ्या. हे सर्व मिश्रण थंड झाल्यावर वाटून घ्या. मिक्सरला ड्रायफ्रुट्स, गूळ आणि खजूर घालून छान वाटून घ्या.एका मोठ्या भांड्यात ड्रायफ्रुट्स-खजूर-गूळ पेस्ट आणि भाजलेले पांढरे तीळ, अळशीच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. आता हाताला तूप लावून छान लाडू वळा. रोज सकाळी मुलांना नाश्त्याला खाऊ द्या

ड्रायफ्रूट्स लाडू

साहित्य

  • सर्वप्रकारचा सुकामेवा

  • खजूर

  • तूप

  • नाचणी पीठ

  • सत्तूचे पीठ

  • कोको पावडर

कृती

ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये थोड तूप टाकून सुकामेवा मंद आचेवर हलका भाजून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये पुन्हा तूप घालून सत्तूचे पीठ, नाचणीचे पीठ परतून घ्या. मिश्रणाला थोडा गोल्डन रंग आल्यावर त्यात कोको पावडर टाकून सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. आता सर्व सुकामे‌वा आणि खजूर मिक्सरमध्ये वाटून घ्या. एका मोठ्या भांड्यात खजूर-सुकामेवा पेस्ट आणि पीठ मिक्स करून घ्या. हाताला तूप लावून मिश्रण थोड थंड झाल्या‌वर त्याचे लाडू वळून घ्या. हवाबंद डब्यात हे लाडू एक महिना राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

Heel Pain: दररोज हिल सॅंडल घालता? संध्याकाळी 'हे' घरगुती उपाय करा, पायदुखी दूर राहील

Marathi bhasha Vijay Live Updates : थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT