बदलते वातावरण आणि दैनंदिन जीवनामुळे आजारपण दिवसेंदिवस वाढत आहे. डायबिटिजच्या रुग्णांची संख्या सतत वाढताना दिसत आहे. डायबिटिजवर कायमस्वरुपी असा उपाय नाही. त्यामुळे अनेक घरगुती उपाय करावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वात जास्त खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे. कडधान्यांचा आहारात समावेश करावा. रोजच्या आहारात डाळी, कडधान्ये खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात. डायबिटिजच्या रुग्णांसाठी उडदाची डाळ खाणे खूप गुणकारी असते. या रुग्णांनी त्यांच्या आहारात उडदाच्या डाळीचा समावेश करावा.
उडदाची डाळ ही चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी चांगली असते. या डाळीत मॅग्नेशियम,पोटॅशियम आणि आयन सारखे पोषक घटक असतात. यात फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे तुम्हाला सारखी भूक लागत नाही. या डाळीत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. त्यामुळे साखरेची पातळी वाढत नाही. उडदाच्या डाळीपासून बनवलेले अनेक पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात. याच पदार्थांविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
उडदाची डाल खिचडी
डायबिटिज रुग्णांसाठी खिचडी अत्यंत आरोग्यदायी असते. खिचडी ही सर्व डाळींपासून बनवली जाते. यात तुम्ही मूग डाळ, चना डाळ आणि उडीदाची डाळ वापरु शकतात. यात तुम्ही भाज्या वापरुन खिचडी चविष्ट बनवू शकता.
पराठा
डायबिटिजच्या रुग्णांसाठी सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा असतो. त्यात तुम्ही उडदाच्या डाळीपासून बनवलेला पराठा खाऊ शकता. चविष्ट आणि पौष्टिक अशा दोन्ही गोष्टी यात असतात. हा पराठा खाल्ल्याने साखरेवर नियंत्रण ठेवू शकता.
कढी
कढी आणि भात हा सकस आणि चवदार समीकरण आहे. यात तुम्ही दही आणि इतर मसाले वापरतात. त्यामुळे ही कढी चवीला छान लागते. उडीद डाळीच्या कढीमध्ये बेसनाचा वापर केला जात नाही. ही कढी तुम्ही चपाती, भाकर आणि भातासोबत खाऊ शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.