Bank Locker Rule : बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेली संपत्ती किती सुरक्षित? नुकसान झाल्यास भरपाई मिळते का? जाणून घ्या नियम

Bank Locker Uses : जगभरातील लाखो लोक त्यांच्या संपत्ती अर्थात सोने, चांदी आणि पैसा यांसारख्या मौल्यवान मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर वापरतात.
Bank Locker Rule
Bank Locker RuleSaam Tv

SBI Rule :

बँकेत खाते उघडल्यानंतर आपल्याला अनेक सुविधा मिळतात. यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पासबूक आणि चेक बुक सारख्या सेवा पुरवल्या जातात. याच बरोबर पुरवली जाणारी आणखी एक सुविधा म्हणजे आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी दिला जाणारा लॉकर.

जगभरातील लाखो लोक त्यांच्या संपत्ती अर्थात सोने, चांदी आणि पैसा यांसारख्या मौल्यवान मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर वापरतात. तसेच चोरी, आग, पूर किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊ शकते. यासाठी भारतीय बँकांचे नियम माहित असणे गरजेचे आहे.

Bank Locker Rule
Gold Silver Rate (28th September): खरेदीसाठी गोल्डन चान्स! सोन्या-चांदीचा भाव गडगडला, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली आणि बँकेच्या (Bank) लॉकरमधून तुमच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या किंवा खराब झाल्यास नुकसानीची भरपाई बँकेकडून होईल अशी पहिली अपेक्षा असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, बँकिंग युनिट लॉकरमध्ये ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंसाठी जबाबदार नसते.

1. नुकसान भरपाई अधिक कमी

नैसर्गिक आपत्ती किंवा कर्मचाऱ्यांनी केलेल्या फसवणूक यासारख्या घटनांच्या बाबतीत बँकेचे दायित्व सुरक्षित ठेव लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या १०० पट इतकेच असेल. यामध्ये तुम्हाला मिळणारी भरपाई ही अधिक कमी असते. लॉकरमध्ये (Locker) कितीही महागडी वस्तू असली तरी तुम्हाला त्याची नुकसान भरपाई ही कमीच मिळेल.

2. बँक अधिक खबरदारी घेते?

ग्राहकांची मालमत्ता अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांना अधिक खबरदारी घ्यावी लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतेही नुकसान झाल्यास बँक कोणतीही जबाबदारी घेत नाही.

3. बँक या गोष्टीची जबाबदारी का घेत नाही?

बँकेत जमा केलेल्या मालमत्तेचे संपूर्ण नुकसान भरुन काढण्याची जबाबदारी नसण्याचे कारण म्हणजे लॉकरमध्ये काय आहे किंवा ते किती मौल्यवान आहे यांची किंमत बँकांना माहित नसणे. त्यामुळे नुकसान भरपाईची किंमत (Price) ठरवणे अशक्य होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com