Healthy Drink Saam Tv
लाईफस्टाईल

Healthy Drink : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी रोज प्या 'हा' रस, त्वचेसोबत आरोग्याला मिळतील जबरस्त फायदे

या ऋतूमध्ये आपल्याला आहारात अशा काही पदार्थांचा समावेश ज्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो.

कोमल दामुद्रे

Healthy Drink : हिवाळ्यात अनेक सर्दी फ्लू सारखे आजार होण्याची शक्यता असते. तसेच आपली रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होत असते. या काळात आपल्या आरोग्यासोबतच त्वचेची देखील काळजी घेणे अधिक गरजेचे आहे.

या ऋतूमध्ये आपल्याला आहारात अशा काही पदार्थांचा समावेश ज्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. अशावेळी आपण हिरव्या भाज्यांचे सेवन करायला हवे. प्रामुख्याने यात पालक व टोमॅटोचा समावेश करायला हवा.

पालक आणि टोमॅटोमध्ये अनेक आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजे आहेत. ज्याचा आरोग्याला अनेक फायदे होतात. यासोबतच पालकमध्ये पोटॅशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन (Vitamins) बी-२ सारखे पोषक घटकही त्यात असतात. तर टोमॅटोमध्ये लाइकोपीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम असते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींपासून तयार केलेला रस हिवाळ्यात आपले शरीर निरोगी ठेवतो. या रसाचे इतर फायदे येथे जाणून घ्या. (Winter Care Tips)

1. पचनास मदत करते

पालक आणि टोमॅटोचा रस पचनाशी संबंधित समस्यांमध्ये देखील फायदेशीर आहे. पालकामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया मजबूत आणि सुरळीत होण्यास मदत होते. त्याचबरोबर टोमॅटोमधील लाइकोपीन तत्व पचनसंस्था मजबूत करते.

2. डीटॉक्समध्ये फायदेशीर

अस्वास्थ्यकर आहारामुळे शरीरात विषद्रव्ये वाढू लागतात. त्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, त्वचा तसेच हृदय आणि यकृताशी संबंधित समस्यांचा धोकाही वाढतो. त्यामुळे पालक आणि टोमॅटोचा रस प्यायल्याने शरीरातील घाण सहज साफ होते.

3. चेहऱ्याची (Skin) चमक वाढवते

पालक-टोमॅटोचा ज्यूस प्यायल्याने चेहऱ्याची चमक वाढते, त्वचा निरोगी राहते कारण हा ज्यूस प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, त्यामुळे त्वचा तजेलदार बनून मुरुमांचा त्रास होत नाही. हा रस पिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वृद्धत्वाचा प्रभाव कमी होतो.

4. रक्ताची कमी होणे

पालक-टोमॅटोचा रस प्यायल्याने अशक्तपणाची समस्या दूर होते. पालकामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते, जे लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो.

पालक-टोमॅटो ज्यूस रेसिपी

Spinach Tomato Juice

साहित्य - 1 कप ताजी पालकची पाने, 2 लाल पिकलेले टोमॅटो

कृती

  • पालक आणि टोमॅटो पाण्याने चांगले धुवून घ्या.

  • धुतल्यानंतर टोमॅटोचे लहान तुकडे करा.

  • नंतर या दोन्ही गोष्टी मिक्सर/ग्राइंडरमध्ये चांगल्या प्रकारे बारीक करून घ्या.

  • आता ते गाळून घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025: आयुर्वेदानुसार श्रावणात कांदा आणि लसूण का खाऊ नये? जाणून घ्या कारण

Raj Thackeray: राज ठाकरे इगतपुरीहून मुंबईच्या दिशेने रवाना, मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचं मार्गदर्शन|VIDEO

Nanemachi waterfall: या विकेंडला धबधब्यावर जायचा विचार करताय? मग अगदी जवळ असलेल्या नानेमाचीचा प्लान करू शकता

Bollywood Celebrity: विम्बल्डनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचा मेळावा, पाहा व्हायरल फोटो

Maharashtra Live News Update: उबाठाच्या सहसंपर्क प्रमुखांनी दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT