उत्तराखंडच्या राजधानी देहरादूनमधून एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. गुरुवारी भरदिवसा विकासनगरमध्ये 12 वीमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीची निर्घृण हत्या केली आहे. मुलीच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करत तिच्या हाताची बोटे कापली, चेहऱ्यावरून तिचे नाक गायब केले होते. तसेच गळा देखील चिरला आणि डोके दगडाने ठेचले होते. यावेळी ही हत्या बघताच लोकांमध्ये घबराहट निर्माण झाली होती. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी धालीपुर शक्ती कालव्याजवळून जणाऱ्यांनी कालव्याच्या काठावर रक्ताने माखलेल्या एका मुलीचा मृतदेह पाहिला. जेव्हा मृतदेहाजवळ गेले तेव्हा त्यांना धक्का बसला. यावेळी त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची चौकशी सुरू केली. त्यांना घटनास्थळी एक दुचाकी आणि एक विळा आढळला. त्यांना संशय आला की मुलीवर या विळ्याने क्रूरपणे हल्ला करण्यात आला आहे. गुन्ह्यादरम्यान मारेकऱ्याने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. मुलीचे बोटे कापल्या गेले होते आणि तिच्या नाकाचा काही भाग तिच्या चेहऱ्यावरून गायब होता. तिचा गळाही गंभीरपणे कापला गेला होता. शिवाय तिच्या डोक्यावर दगडाने ठेचले होते.
पोलिसांनी सांगितले की ही विद्यार्थिनी धालीपूरची रहिवासी असून ती १२वीत शिकते. बुधवारी संध्याकाळी ती तिच्या चुलत भावासोबत औषध आणण्यासाठी दुचाकीवरून बाहेर पडली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिचे कुटुंब टेंशनमध्ये होते. कुटुंबाने रात्रीपासून सकाळपर्यंत दोघांचा शोध घेतला. दरम्यान, गुरुवारी सकाळी काही स्थानिकांनी विद्यार्थिनीच्या कुटुंबाला धालीपूर शक्ती कालव्याच्या काठावर एका मुलीचा मृतदेह पडल्याची माहिती दिली.
विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्याने आणि चुलत भाऊ बेपत्ता असल्याने पोलिसांना संशय तिच्या भावावर आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली तेव्हा एका पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीमध्ये विद्यार्थिनी तिच्या चुलत भावासोबत दुचाकीवर जाताना दिसली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चुलत भावाने काहीवेळाआधीच एका दुकानातून विळा खरेदी केला होता. त्याने या विळ्याने विद्यार्थ्याची हत्या केली. पोलीस अधिकारी अजय सिंह म्हणाले की, गुन्ह्यामागील कारण तपासाचा विषय आहे. तोही आता बेपत्ता आहे. विद्यार्थ्याची हत्या केल्यानंतर त्याने धालीपूर शक्ती कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे. एसडीआरएफ टीम कालव्यात शोध घेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.