Shocking: हादरवणारं दृश्य, नवरा-बायकोचे मृतदेह बेडरूममध्ये, ३ मुलं...त्या भयाण रात्री घरात नेमकं काय घडलं?
Delhi News Saam Tv Marathi

Shocking: हादरवणारं दृश्य, नवरा-बायकोचे मृतदेह बेडरूममध्ये, ३ मुलं...त्या भयाण रात्री घरात नेमकं काय घडलं?

Greater Noida Family Poisoning Case: ग्रेटर नोएडामध्ये नवरा-बायकोंनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना देखील विष दिलं होतं. या घटनेत नवरा-बायकोचा मृत्यू झाला. तर त्यांची तिन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Published on

Summary -

  • ग्रेटर नोएडामध्ये नवरा-बायकोचे मृतदेह बेडरूममध्ये आढळले

  • तिन्ही मुले बेशुद्ध अवस्थेत सापडली

  • तिन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत

  • कौटुंबिक कारणांमुळे विष प्राशन केल्याचा प्राथमिक संशय

दिल्लीच्या ग्रेटर नोएडामध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. आई-वडिलांनी ३ मुलांसह विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आई-वडिलांचा मृत्यू झाला तर तीन मुलांची गंभीर आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. शेजारच्यांनी या मुलांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या घटनेमुळे ग्रेटर नोएडामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशच्या गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील ग्रेटर नोएडामध्ये घडली. २८ जानेवारीच्या रात्री ग्रेटर नोएडाच्या ठाणे इकोटेक थर्ड परिसरातील सदुल्लापूर गावात नवरा-बायकोने कौटुंबिक कारणांमुळे विष प्राशन करून आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह बेडवर मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. तर त्यांची तीन मुलं बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. शेजारच्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केले होते.

Shocking: हादरवणारं दृश्य, नवरा-बायकोचे मृतदेह बेडरूममध्ये, ३ मुलं...त्या भयाण रात्री घरात नेमकं काय घडलं?
Crime: शक्तीवर्धक गोळ्या घेऊन ठेवायचा शरीरसंबंध, त्रासाला कंटाळून महिलेने नवऱ्याला संपवलं

पोलिसांनी सांगितले की, मूळचे प्रयागराजच्या असरवाल कला येथील रहिवासी असलेले आणि सध्या सदुल्लापूर येथे राहत असलेले श्रवण आणि त्याची बायको नीलम यांनी आत्महत्या केली. काही कौटुंबिक कारणांमुळे रात्री उशिरा त्यांनी विष प्राशन केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचही जणांना रुग्णालयात नेले. त्यातील श्रवण आणि त्याच्या बायकोला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर त्यांची १० वर्षांची मुलगी वैष्णवी, ८ वर्षांचा मुलगा वैभव आणि ४ वर्षांचा मुलगा लाडो यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या तिघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. श्रवण आणि नीलम यांच्या आत्महत्येमागच्या कारणाचा तपास केला जात आहे.

Shocking: हादरवणारं दृश्य, नवरा-बायकोचे मृतदेह बेडरूममध्ये, ३ मुलं...त्या भयाण रात्री घरात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : दादरमधील धक्कादायक घटना! बेडरूमच्या बाल्कनीतून उडी मारत महिलेने संपवलं आयुष्य, कारण आलं समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com