Papaya halwa google yandex
लाईफस्टाईल

Papaya: पपईचा हलवा फक्त स्वादिष्ट नाही तर पौष्टिक सुद्धा; नोट करा रेसीपी

Papaya Halwa Recipe: पपई आरोग्यासाठी फायदेशीर असते. हिवाळ्यात पपईचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय घराघरात मिठाईची चर्चा सुरू झाली की, सर्वात पहिली गोष्ट मनात येते ती म्हणजे हलवा, नाही का? गाजर आणि रव्याचा हलवा तुम्ही खूप खाल्ला असेल, पण आज आम्ही तुम्हाला एक वेगळी आणि स्वादिष्ट रेसीपी सांगणार आहोत. ही केवळ स्वादिष्टच नाही तर तुमच्या पचनसंस्थेसाठीही खूप फायदेशीर आहे.

पपई हे औषधी गुणधर्मानी परिपूर्ण फळ आहे. पपई हे फळ लोकांना नाश्त्यामध्ये किंवा जेवताना सेवन करण्यास आवडते. या फळामध्ये अॅंटीऑक्सिंडंट्स गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. या फळाचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून बचाव होतो. पण तुम्ही कधी पपईचा हलवा खाल्ला आहे का. जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना पपई आवडत नसेल तर तुम्ही पपईचा स्वादिष्ट हलवा बनवू शकता जो सर्वांना आवडेल. चला तर जाणून घेऊया पपईचा हलवा बनवण्याची कृती.

साहित्य

१ कच्ची पपई

१ लीटर दूध

१ वाटी साखर १/४ तूप

१० - १२ बादाम (चिरलेले)

१०-१२ काजू ( चिरलेले)

१०-१२ मनुके (चिरलेले)

४-५ वेलची

पपई हलवा बनवण्याची कृती

सर्वप्रथम पपईचा हलवा बनवण्यासाठी पपई सोलून किसून घ्या. यानंतर एका पातेल्यात दूध अॅड करुन ते मध्यम आचेवर उकळा.नंतर उकळत्या दुधात किसलेली पपई मिक्स करा आणि सतत चमच्याने ढवळत राहा. यानंतर पपई थोडी मऊ झाल्यावर त्यात साखर अॅड करुन मिक्स करा. नंतर त्यात तूप अॅड करा आणि सतत चमचाने ढवळत राहा.

मिश्रण घट्ट होऊ लागले की त्यात चिरलेले बदाम, काजू आणि मनुके अॅड करा. शेवटी ठेचलेली वेलची मिक्स करा. मिश्रण सतत ढवळत असताना घट्ट आणि सोनेरी होईपर्यंत शिजवा. चला तयार झाला स्वादिष्ट पपईचा हलवा. हलव्याला चिरलेले काजू आणि बादामने सजवून सर्व्ह करा.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT