Oranges: संत्री खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Orange Benefits: संत्री खाणं आपल्या सर्वांना आवडतं. परंतु दररोज संत्री खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का ? जाणून घ्या.
Oranges
Orangesyandex
Published On

संत्री हे आरोग्यासाठी एक उत्तम फळ आहे. काही लोक नाश्त्यामध्ये संत्रीचा ज्यूस पितात तर काही असेच खातात. हे फळ अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. संत्री हे व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले फळ आहे. त्यामुळे व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास डॅाक्टर संत्री खाण्याचा सल्ला देतात.

हृदयासाठी फायदेशीर

संत्र्याचे सेवन केल्यास कॅालेस्ट्रोलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक, कोरोनरी धमनी रोग आणि ट्रिपल वेसल डिसीज सारख्या आजारांचा धोका कमी होतो. त्यामुळे संत्र्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

निरोगी त्वचा

संत्री हे व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे. तसेच यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होतात आणि त्वचा निरोगी होते. यामुळे चेहरा चमकदार होतो.

Oranges
Bitter Foods: तुम्हालाही मसालेदार पदार्थ खायला आवडतात? मग या समस्यांसाठी व्हा सज्ज

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

संत्र्यांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते आणि फ्रुक्टोज म्हणजेच फळातल्या साखरेचे प्रमाण देखील कमी असते. त्यामुळे संत्री खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास संत्रीचा डाएटमध्ये समावेश करु शकता.

अॅनिमियापासून बचाव

संत्र्यांमध्ये लोह असल्यामुळे ज्यांना अॅनिमियाचा त्रास आहे त्यांनी संत्री नियमित खावे. यामुळे तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता पूर्ण होईल आणि अॅनिमिया आजाराचा धोका काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited by : Priyanka Mundinkeri

Oranges
Healthy Tiffin Recipe: रोजच्या पोळी-भाजीचा कंटाळा आलाय? मग बनवा 'हे' खमंग थालीपीठ

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com