Bitter Foods: तुम्हालाही मसालेदार पदार्थ खायला आवडतात? मग या समस्यांसाठी व्हा सज्ज

Bitter Foods Side Effects: तिखट अन्न खाणाऱ्यांची संख्या भारतात खूप जास्त आहे.
Bitter Foods
Bitter Foods Side EffectsSAAM
Published On

तिखट अन्न खाणाऱ्यांची संख्या भारतात खूप जास्त आहे, पण अशा खाण्याच्या सवयीमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे तिखट खाण्याची मर्यादा पाळणे आवश्यक असते. मसालेदार अन्न हा भारतीय अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सामान्यत: आपल्याला लाल मिरची किंवा तिखट मसाला डाळीपासून सर्व प्रकारच्या पाककृती आवडतो. यासोबत प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात तिखट जास्त प्रमाणात वापरले जाते. ही सवय वेळीच केमी केली पाहिजे. अन्यथा तुम्हाला खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

जास्त मसालेदार अन्न का खाऊ नये?

अपचन

जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेत अडचण येऊ शकते. यामुळे अपचन, गॅस, पोटाचा त्रास होऊ शकतो. या समस्या तुम्हाला नियमित होवू शकतात. त्यामुळे मसालेदार पदार्थांचे सेवन मर्यादित करणे महत्वाचे आहे.

Bitter Foods
Healthy Tiffin Recipe: रोजच्या पोळी-भाजीचा कंटाळा आलाय? मग बनवा 'हे' खमंग थालीपीठ

मानसिक समस्या

जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. यामुळे अधिक तणाव, चिंता आणि अस्वस्थता येऊ शकते. मसालेदार अन्न काळजीपुर्वक सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्याचा मानसिक आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होऊ नये.

उच्च रक्तदाब

मसालेदार अन्नामध्ये मीठ आणि मसाले जास्त असतात, ज्यामुळे रक्त वाढू शकते, जर तुम्ही आधीच उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर मिरची आणि मसाल्यांचे सेवन कमी करा, अन्यथा दीर्घकाळापर्यंत हृदयविकार होऊ शकतात. होऊ शकते.

कोरडी त्वचा

मसालेदार अन्न जास्त प्रमाणात खाल्याने त्वचेवर खूप परिणाम होतो. त्याने त्वचेची आद्रता कमी होते. त्यामुळे कोरडेपणा आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मिरची आणि मसाले मर्यादित प्रमाणातच खाणे फायदेशीर ठरेल.

वजन वाढणे

तिखट आणि मसालेदार अन्न जास्त प्रमाणात खाल्याने वजन वाढू शकते. याचे कारण म्हणजे त्यात जास्त कॅलरिड असतात आणि ते खाल्यानंतर तुम्हाला जास्त भूक लागते.

मुळव्याध

तुमच्या लक्षात आलेच असेल की जे लोक जास्त मिरच्या आणि मसाले खातात त्यांना पाईल्स होतात. आजच मसालेदार पदार्थ खाणे कमी केलेले बरे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

written By: Sakshi Jadhav

Bitter Foods
Thyroid Eye Disease: आरोग्यासोबतच थायरॉईडचा डोळ्यांवरही होतोय वाईट परिणाम? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com