Health | रोज एवढी पावलं चाला आणि फिट राहण्यासह आयुष्यही वाढवा Saam Tv News
लाईफस्टाईल

Health | रोज एवढी पावलं चाला आणि फिट राहण्यासह आयुष्यही वाढवा

पायी चालणे हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वात फायदेशीर आणि सोपा उपाय आहे. मात्र नक्की किती पावलं दररोज चालावं याबद्द्ल अनेक मत-मतांतर आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयुर्वेदात सांगितलं आहे की, दररोज पायी चालणे हे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. जेवण झाल्यानंतरही शतपावली (शंभर पावले चालणे) करण्याचा सल्ला दिला जातो. शतपावलीमुळे जेवण लवकर पचण्यास मदत होते. त्यामुळे पायी चालणे हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वात फायदेशीर आणि सोपा उपाय आहे. मात्र नक्की किती पावलं दररोज चालावं याबद्द्ल अनेक मत-मतांतर आहेत. मात्र एका अभ्यासात दररोज ७ हजार पावलं चालल्याने आयुष्य वाढते आणि मृत्यूचा धोकाही ५० ते ७० टक्क्यांनी कमी होतो, असे दिसून आले आहे. जामा नेटवर्क ओपन जर्नलमध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. (Health | walk That steps every day and stay fit and extend your life)

हे देखील पहा -

निरोगी आयुष्यासाठी सकस आहार, पुरेशी झोप आणि व्यायमही आवश्यक असतो. यासाठी तज्ज्ञ रोज चालण्यास सांगतात. अभ्यासानंतर तज्ज्ञांनी सांगितले की, दररोज ७ ते ९ हजार पावलं चालणाऱ्या स्वयंसेवकांच्या आरोग्याला याचा खूपच फायदा होताना दिसला. त्यामुळे दररोज ७ हजार पावलं चालून तुम्ही फिट राहण्यासोबतच स्वतःचं आयुष्यही वाढवू शकता.

पायी चालण्याचे फायदे:

१) वजन वाढण्यावर नियंत्रण

दररोज अर्धा तास पायी चालणाऱ्यांची पचनशक्ती सुधारते आणि त्यांच्या जास्त कॅलरीज खर्च होतात. पायी चालणे हा हृदयासाठीही सोपा व्यायाम मानला जातो, त्यामुळे वजन संतुलित राहण्यास मदत होते.

२) पायी फिरल्याने आपले मस्तक ताजेतवाने राहते

दररोज काही वेळ पायी फिरल्यास आपण ताजेतवाने राहता. यामुळे आपण आपली कामेही अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. अनेक मनोवैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार दररोज काही वेळ पायी फिरल्यास सुस्ती आणि अधिक चिंतेची अनेक लक्षणं दूर होतात.

३) पायी फिरणे आपल्याला सांधेदुखीपासून वाचवेल

जास्त वय असलेल्यांनी दररोज १५ मिनिटे आणि आठवड्यात किमान एक तास पायी फिरल्यास ते स्वतःला सांधेदुखीपासून वाचवू शकतात. २०१९ मध्ये American Journal of Preventive Medicine मध्ये प्रसिध्द झालेल्या एका अहवालात त्यांनी ४९ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि सांधेदुखी असलेल्या १५६४ लोकांवर संशोधन केले. त्यांना दररोज १५ मिनिटे पायी फिरण्यास सांगण्यात आले. काही आठवड्यांनंतर यातील अनेकांची सांधेदुखी कमी झाल्याचे आणि शरीरात उत्साह वाढल्याचे दिसून आले.

४) पायी फिरणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता कमी होते

पायी फिरण्याने शरीरात इन्सुलिनचा वापर योग्य पध्दतीने करू शकते. जर आपल्याला मधुमेह होण्याची शक्यता असेल किंवा आपल्याला याचा त्रास असेल तर काही मिनिटे पायी फिरणे आपल्यासाठी आरोग्यदायी आहे.

अशा प्रकारे पायी चालण्याचे अनेक फायदे आहेत. शिवाय पायी चालण्यासाठी वेळेची किंवा जागेची कोणतीही मर्यादा नाही आणि हे पायी चालण्याचा खर्चदेखील शून्य आहे. त्यामुळे शून्य रुपयांत तुम्ही फिट राहण्यासोबतच स्वतःचं आयुष्यही वाढवू शकता. तर चालायला सुरवात करा...

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Misal Pav Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा झणझणीत मिसळ, रेसिपी वाचा

2025 Horoscope: नव्या वर्षात शुक्रामुळे तयार होणार मालव्य राजयोग; 'या' राशींची होणार भरभराट

Maharashtra Politics : पवार-ठाकरेंच्या सूचनेवरुन मनोज जरांगेशी संवाद, त्यानंतर माघार; असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट

Winter Season: हिवाळ्यात मध खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Success Story: लंडनमधील कोट्यवधींची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS ऑफिसर दिव्या मित्तल यांची यशोगाथा

SCROLL FOR NEXT