Tendli Sabzi Benefits Saam TV
लाईफस्टाईल

Tendli Sabzi Benefits : 'ही' १० रुपयांची भाजी अनेक आजारांवर गुणकारी; डायबिटीजपासून किडनीपर्यंत सर्व आजार छुमंतर

Health Tips : पालेभाज्या, फळ भाज्या खाणे आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. त्यामुळे आज अवघ्या १० रुपयांनाही मिळणाऱ्या तोंडली या भाजीचे आरोग्यासाठीचे फायदे जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

सध्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात तुम्ही अनेक समस्यांचा सामना करत असाल. डोक्यावरील ताण वाढल्याने आरोग्यावर देखील त्याचे गंभीर परिणाम जाणवतात. थकवा येणे, व्हिटॅमीन सीची कमतरता, डायबिटीज, ब्लड प्रेशर यातर आता सामान्य समस्या झाल्या आहेत. १०० व्यक्तींपैकी ८५ व्यक्तींना या व्याधी असतीलच.

आता अशा सर्व आजारांना वाढवण्याचं कारण आपण स्वत: असतो. अनेक मुलं-मुली आहारात भाज्यांचा समावेश करत नाहीत. पालेभाज्या, फळ भाज्या खाणे आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. त्यामुळे आज अवघ्या १० रुपयांनाही मिळणाऱ्या तोंडली या भाजीचे आरोग्यासाठीचे फायदे जाणून घेऊ.

वजन कमी करण्यास मदत

तोंडली या भाजीमध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे आपल्या आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो. शरीरात अतिरिक्त चरबी वाढत नाही. तसेच तुम्ही लठ्ठ असाल तर चरबी कमी करण्यास देखील मदत होते.

पचन सुधारते

अनेक व्यक्तींना वयानुसार शरीराची जास्त हालचाल करता येत नाही. त्यामुळे खाल्लेलं जेवण वेळेत पचत नाही. बद्धकोष्ठता जाणवते, अशा व्यक्तींनी तोडलीची भाजी खावी. ही भाजी पचण्यासाठी हलकी असते. यासह अशा व्यक्तींनी केवळ पालेभाज्यांचे सेवन करावे.

निरोगी हृदय

ज्या व्यक्ती तोंडलीचे सेवन करतात त्यांना कधीच हृदयविकाराचा सामना करावा लागत नाही. यामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम असते जे तुमचे हृदय निरोगी ठेवते.

व्हिटॅमीन ए

अनेक लहान मुलांमध्ये व्हिटॅमीनची कमी असते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर सफेद डाग किंवा नखांर पाढरे ठिपके पडलेले दिसतात. व्हिटॅमीनची कमी असल्याने अशा मुलांना तोंडलीची भाजी खाण्यासाठी द्यावी.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही तोंडलीच्या भाजीचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली, दिली UPSC परीक्षा, पहिल्या प्रयत्नात IPS; स्वीटी सहरावत यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: जालना शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्यांना नदीचे स्वरूप

एक नंबर! इलेक्ट्रिक टू-व्हीलर मिळेल सब्सिडी; स्वस्तात येईल बाईक, 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

Horoscope: प्रेमाची कळी खुलणार, जवळीक वाढेल; नाराजी होईल दूर

Tirgrahi Yog: 50 वर्षांनंतर बनणार त्रिग्रही राजयोग; शुक्र-सूर्य देवाच्या कृपेने काही राशींचं आयुष्य पालटणार

SCROLL FOR NEXT