Diabetes  Canva
लाईफस्टाईल

Diabetes असल्यास आहारात अंडी खाणं आरोग्यासाठी योग्य आहे का? जाणून घ्या

Diabetes: अंडी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि पोषक मानली जातात. अंड्यामध्ये प्रोटिन्सचा भरपूर प्रमाणात समावेश असल्यामुळे अंडी खाण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो. मधुमेहच्या रुग्णांनी अंडी खावेत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Egg Consumption and Diabetes: अंडी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि पोषक मानली जातात. अंड्यामध्ये प्रोटिन्सचा भरपूर प्रमाणात समावेश असल्यामुळे अंडी खाण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो. अंड्यांपासून विविध पदार्थ बनवली जातात.मधूमेह आणि हृदयासंबंधीत समस्या असलेल्या रुग्णांनी अंड्यामधील पिवळा भाग जास्त प्रमाणात खऊ नये. यामुळेच मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी अंडी खाणं फायदेशीर ठरते का? असा प्रश्न अनेकदा पडत असतो.

आजकाल मधुमेह होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बदलत्या जीवनशैलामुळे लहान वयात मधुमेह होण्याची शक्याता असते. मधुमेहाचा योग्य वेळी उपचार केले नाहीत तर त्याचा आरोग्यावर गंभार परिणाम होतो. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णाना न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण मधुमेहाच्या रुग्णांनी अंडी खावे की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. माहितीनुसार, अंड्यांमद्ये शरीराला आवश्यक असलेले अमीनो ऍसिड आढळतात, ज्यामुळे शरीराचे आरोग्य चांगले राहाते. तुमच्या आहारात जर प्रोटीनची मात्रा कमी झाली तर शरीरातील स्नायू कमवकुवत होतात आणि त्यामुळे उतार वयात मधुमेहाच्या जास्त त्रास होतो. कमकुवत स्नायूंमुळे फॅटी लिव्हर या सारखे समस्या होण्यास कारणीभूत ठरतात, ज्यामुळे लिव्हर सिरोसिस आणि कर्करोग या सारख्या समस्या होऊ शकतो.

अंड्याच्या पांढऱ्या आणि पिवळ्या भागात अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे शरीराला फायदे होतात. अंड्यामधील पिवळ्या भागापेक्षा पांढऱ्या भागात जास्त प्रमाणात प्रोटीन असते. अंड्यातील पिवळ्या भागात भरपूर प्रमाणात फॅट्स असतात ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते. अंड्यातील पिवळ्या भागात तीन पट जास्त कॅलरी बनवतात त्यामुळे त्यात जास्त जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात.

अंड्याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेच्या पातळीवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. माहितीनुसार, नैसर्गिक प्रथिने पुरेशा प्रमाणात घेतल्यास शरीरातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. पण, मधुमेहाचे रुग्ण अंडी खाऊ शकतात असा निष्कर्ष निघतो. कारण त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने जास्त प्रमाणात असतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT