Diabetes Home Remedies
Diabetes Home RemediesSaam Tv

Diabetes Home Remedies : मधुमेहींनो, रक्तातील साखर सतत वाढते? 'हे' घरगुती उपाय करुन पाहा

हल्ली मधुमेहाच्या आजारापासून अनेक रुग्ण त्रस्त आहेत.

Diabetes Home Remedies : अनियमित जीवनशैली व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होणारा आजार मधुमेह. हल्ली मधुमेहाच्या आजारापासून अनेक रुग्ण त्रस्त आहेत.

या आजारात लवकर थकवा जाणवणे, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, भूक वाढणे, वारंवार लघवी होणे, थोड्या वेळाने तोंड कोरडे पडणे, अस्पष्ट दृष्टी, वागण्यात चिडचिडेपणा इ. जर तुम्हाला याचा त्रास होत असेल तर या काही घरगुती उपायांचा तुम्हाला फायदा होईल.

Diabetes Home Remedies
Diabetic Patients : मधुमेहांच्या रुग्णांनी गरम पाण्याने आंघोळ केल्यास पडू शकते भारी; जाणून घ्या, त्याचे कारणे
 • कारल्याच्या रसात अर्धे लिंबू, चिमूटभर काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घालून आठवड्यातून तीन दिवस म्हणजे प्रत्येक दिवशी प्यायल्याने मधुमेहापासून आराम मिळतो.

 • एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर मिसळून आठवड्यातून दोनदा प्यायल्याने आराम मिळेल.

 • नियमित जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.

 • डायबिटीजच्या बाबतीतही सलगम सॅलड खाणे फायदेशीर ठरते.

 • अर्धा चमचा जवसाच्या बियांची पावडर कोमट पाण्यासोबत सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहाते.

 • मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून चघळून सकाळी खाऊन उरलेले पाणी प्यायल्याने मधुमेहाचा त्रास होत नाही.

 • रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सोलून सकाळी खाल्ल्याने मधुमेहात फायदा होतो.

Diabetes Home Remedies
Diabetes Home RemediesSaam Tv
 • रोज सकाळी अर्धा कप ताज्या गव्हाच्या गवताचा रस प्यायल्याने मधुमेहापासून आराम मिळतो.

 • मधुमेह असल्यास त्यावर मीठ लावून जांभूळ खाल्ल्यास आराम मिळतो. जांभूळाची चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्यानेही आराम मिळतो.

 • 10 मिलीग्राम करवंदाच्या रसात चिमूटभर हळद मिसळून दिवसातून दोनदा घेतल्यास मधुमेहाचा त्रास होत नाही.

 • डायबिटीजच्या रूग्णांना सरकीच्या पानांचे सेवन केल्याने फायदा होतो.

 • सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेहातही आराम मिळतो.

 • पेरूवर काळे मीठ शिंपडून ते खाल्ल्याने मधुमेहात फायदा होतो.

 • ग्रीन टीचे नियमित सेवन केल्याने मधुमेहही नियंत्रणात राहतो.

 • रोज रिकाम्या पोटी दोन-तीन तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास मधुमेहाचा धोका कमी होतो.

 • दूध आणि साखरेशिवाय कॉफीचे सेवन केल्याने मधुमेहापासून आराम मिळतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com