Knee Pain Home Remedy Saam TV
लाईफस्टाईल

Knee Pain Home Remedy : गुडघ्यांच्या वेदना असह्य झाल्यात, काही केल्या आराम नाही; मग 'हा' जालीम उपाय आजच करा

Oil For Knee Pain : गुडघ्यांच्या वाट्या एकमेकांना घासल्या जातात. त्यामुळे आपला त्रास आणखी वाढत जातो. काही व्यक्तींना गुडघ्यांचा त्रास इतका जास्त असतो की त्यांना चालण्यास आणि उठ-बस करण्यात सुद्धा वेदना जाणवतात.

Ruchika Jadhav

वयानुसार आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. वय झाल्यावर आपल्या शरीरातील हाडे ठिसुळ होतात. हाडांच्या कमजोरीसह अनेक व्यक्तींना गुडघे दुखीचा त्रास होतो. गुडघ्यांमधील जेल युक्त द्रव्य कमी झाल्याने गुडघ्यांच्या वाट्या एकमेकांना घासल्या जातात. त्यामुळे आपला त्रास आणखी वाढत जातो. काही व्यक्तींना गुडघ्यांचा त्रास इतका जास्त असतो की त्यांना चालण्यास आणि उठ-बस करण्यात सुद्धा वेदना जाणवतात.

गुडघे दुखण्यावर तुम्ही आजवर विविध उपाय केले असतील. मात्र याचा काहीच उपयोग आणि परिणाम होत नाही. काही व्यक्ती या त्रासावर विविध प्रकारच्या ट्यूब पायांवर अप्लाय करतात. तर काही व्यक्ती थेट गुडघ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा तयार असतात. मात्र असे करणे घातक असते. अनेकदा ऑपरेशन फसते आणि आपल्याला कायमचे अपंगत्व येऊ शकते.

उपाय

त्यामुळे आज आम्ही गुडघ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत त्याची माहिती सांगणार आहोत. हा उपाय अगदी रामबाण आहे. याने तुम्हाला अगदी २ दिवसांत आराम मिळू शकतो. सर्वात आधी गव्हाचं किंवा मातीची कणीक मळा. तसेच गुडघ्यावर गोल आकार आणि मध्ये खड्डा करून संपूर्ण गुडघ्यावर हे पीठ लावून घ्या. विहिर ज्या आकाराची असते तो आकार तुमच्या गुडघ्यावर तयार करा.

साहित्य

सरसोचं तेल

कांदा

लसूण

लवंग

मिरी

मेथी दाणे

कृती

एका भांड्यात तेल घ्या. तेल छान तापवून घ्या. तेल तापल्यानंतर त्यात एक कांदा मोठे तुकडे करून टाका. त्यानंतर यामध्ये लसूण टाका. तसेच लवंग आणि मिरी देखील या तेलात टाका. त्यानंतर थोडे मेथी दाणे यामध्ये मिक्स करा. तेलात हे सर्वकाही छान फ्राय होऊ द्या. कांदा आणि लसूण यांना थोडा गोल्डन ब्राउन येऊ द्या. त्यानंतर तेल थंड झाल्यावर एका भांड्यात गाळून घ्या.

पुढे हे तेल गुडघ्यांवर अप्लाय करा. गुडघ्यांना विहिरीसारखा पिठाचा आकार केल्याने तुम्ही यामध्ये जास्त तेल ओतून ठेवू शकता. तेल हळू हळू पायात मुरत जाते आणि हाडांना चांगली मजबुती मिळते. यामुळे गुडघेदुखी सुद्धा काही दिवसांत ठीक होऊ शकते.

टीप : ही सामान्य माहिती आहे. या माहितीचा आम्ही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT