
MS Dhoni Knee surgery Update: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. धोनीच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पूर्ण झालीची माहिती समोर येत आहटे. संपूर्ण आयपीएलमध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रासलेला दिसत होता. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली होती. ताज्या मीडिया रिपोर्टनुसार धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबईतील कोलिकाबेन रुग्णालयात गुरुवारी म्हणजेच 1 जून रोजी सकाळी धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
आयपीएल स्पर्धा जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनी बुधवारी गुडघ्याच्या तपासणीसाठी मुंबईत आला होता. यानंतर डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. धोनीची शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून डॉ. दिनशॉ परडीवाला यांनी ती केल्याचेही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. हे तेच डॉक्टर आहेत ज्यांनी रिषभ पंतवर देखील शस्त्रक्रिया केली होती.
गुजरात टायटन्सविरुद्ध 31 मार्च रोजी खेळल्या गेलेल्या पहिल्या आयपीएल सामन्यात धोनीला दुखापत झाली होती. डाइव्हा मारून चेंडू थांबवताना धोनीला ही दुखापत झाली होती. मात्र यानंतरही त्याने स्पर्धेतील एकही सामना गमावला नाही. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात धोनी फलंदाजीला जाण्यापूर्वी पायावर पट्टी बांधताना दिसत आहे.
गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या फायनलमधील हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. या सामन्यात धोनी फलंदाजीला जाण्यापूर्वी पायाला पट्टी बांधत होता असे म्हटले जात आहे. मात्र अंतिम सामन्यात धोनी मैदानावर फलंदाजी करण्यासाठी उतरला खरा. परंतु तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला होता. धोनीने यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील 12 डावात फलंदाजी करताना 26 च्या सरासरीने आणि 182.46 च्या स्ट्राईक रेटने 104 धावा केल्या. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 32 होती. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 10 षटकार आणि 3 चौकार निघाले.
चेन्नईने पाचव्यांदा पटकावले विजेतेपद
महेंद्रसिह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने सोमवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचे हे पाचवे आयपीएल विजेतेपद आहे. यासह चेन्नईने आयपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली आहे. (Latest Sports News)
निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य
अंतिम सामना जिकंल्यानंतर धोनीने निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले. “माझी निवृत्ती जाहीर करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. मला जेवढे प्रेम मिळाले आहे, इथून निघून जाणं ही सोपी गोष्ट आहे, पण त्याहून (Cricket News) कठीण गोष्ट म्हणजे 9 महिने मेहनत करून पुन्हा आयपीएल खेळण्याचा प्रयत्न करणं. हे माझ्याकडून एक भेट असेल, शरीरासाठी ते सोपं होणार नाही” अशी धोनीने प्रतिक्रिया दिली. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.