WTC Final 2023: पुजारा ठरणार टीम इंडियासाठी संकटमोचक! दिग्गजाने सांगितला विजयाचा मास्टरप्लॅन

Sunil Gavaskar On WTC Final: सुनील गावसकर यांनी भारतीय संघाच्या रणनीतीबाबत मोठे वक्तव्य करत मोलाचा सल्ला दिला आहे.
sunil gavaskar
sunil gavaskar saam tv

Cheteshwar Pujara: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा बिगुल वाजला आहे. ७ ते ११ जून दरम्यान होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत.

भारतीय संघातील खेळाडू ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करण्यासाठी जोरदार सराव करताना दिसून येत आहेत. दरम्यान या सामन्यापूर्वी सुनील गावसकर यांनी भारतीय संघाच्या रणनीतीबाबत मोठे वक्तव्य करत मोलाचा सल्ला दिला आहे.

sunil gavaskar
WTC 2023 Final: IPL ची ट्रॉफी हुकली म्हणून काय झालं? रोहितकडे विराटला मागे सोडत इतिहास रचण्याची संधी..

सुनील गावसकर यांनी म्हटले की, 'तो(पुजारा) तिथेच आहे, त्यामुळे त्याने पाहिलं आहे की ओव्हलची खेळपट्टी कशी आहे. तो लंडनमध्ये असला तरी ससेक्स हे लंडनपासून जवळ आहे. त्यामुळे त्याला चांगलंच माहित असेल की, तिथे काय सुरू आहे. त्यामुळे फलंदाजी क्रम ठरवताना चेतेश्वर पुजाराचं मत देखील तितकंच महत्वाचं असणार आहे.'

तसेच ते पुढे म्हणाले की, 'हे विसरुन चालणार नाही की, चेतेश्वर पुजारा हा ससेक्स संघाचा कर्णधार होता. याच संघात स्टीव्ह स्मिथ देखील होता. त्यामुळे नक्कीच पुजाराने स्टीव्ह स्मिथसाठी रणनीती आखली असेल.' भारतीय संघातील फलंदाज आयपीएल स्पर्धा खेळून आलेल्या भारतीय फलंदाजांना सुनील गावसकर यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, भारतीय फलंदाजांनी शक्य होईल तितकं उशीरा खेळायला हवं. (Latest sports updates)

sunil gavaskar
CSK Trophy : देव पावला! IPL जिंकताच चेन्नईची ट्रॉफी पोहोचली तिरुपतीच्या चरणी -VIDEO

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असे आहेत दोन्ही संघ :

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, अॅलेक्स क्ॅऱी (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेज़लवुड, ट्रेविस हेड, जॉश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख़्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, टॉड मर्फ़ी, स्टीवन स्मिथ (उपकर्णधार) मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

राखीव खेळाडू: मिचेल मार्श, मॅट रेनशॉ.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com