Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips : Foodie लोकांनी या गोष्टी लक्षात ठेवा अन् निरोगी राहा

Foodie People : वजन कमी करणे हे फूडी लोकांसाठी खूप आवश्यक काम आहे, ज्यामुळे त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा फूडी लोकांसाठी आहार घेणे अधिक कठीण आहे. तर फूडी लोकांचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांच्या आवडत्या पदार्थांचे सेवन करणे सोडून देणे हा पर्याय अजिबात उरत नाही.

Shraddha Thik

Weight Loss :

वजन कमी करणे हे फूडी लोकांसाठी खूप आवश्यक काम आहे, ज्यामुळे त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा फूडी लोकांसाठी आहार घेणे अधिक कठीण आहे. तर फूडी लोकांचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांच्या आवडत्या पदार्थांचे सेवन करणे सोडून देणे हा पर्याय अजिबात उरत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी काही टीप्स (Tips) घेऊन आलो आहोत, जे तुमचे टार्गेट साध्य करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

थंड पाणी पिऊ नका

उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्याने थोड्यावेळ आराम मिळतो, पण ते आरोग्यासाठी चांगले नाही. कोमट पाणी प्रत्येक प्रकारे आरोग्यासाठी चांगले असते. परंतू थंड पाणी (Water) प्यायल्याने शरीराचे तापमान कमी होते.

पण पचन व्यवस्थित राहण्यासाठी शरीराचे तापमान सामान्य असले पाहिजे, त्यामुळे काहीही खाल्ल्यानंतर थंड पाणी पिणे टाळा. कोमट पाणी प्यायल्यास उत्तम होईल , त्यामुळे तेलकट आणि जंक फूड (Food) पचायला सोपे जाते, पण नेहमी काही खाल्ल्यानंतर अर्ध्या तासानंतरच पाणी प्यावे.

सॉफ्ट ड्रिंक्सऐवजी हेल्दी ड्रिंक्स घ्या

पिझ्झा किंवा बर्गरसोबत सॉफ्ट ड्रिंकचे कॉम्बिनेशन छान लागते यात शंकाच नाही, पण ते आरोग्यासाठी चांगले नाही. तेलकट अन्नासोबत काही हेल्दी ड्रिंक घेणे चांगले . यामध्ये लिंबूपाणी, शिंकजी, ताक, लस्सी असे पर्याय निवडा. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी, कॅमोमाइल टी देखील उत्तम आहे.

अल्टरनेट आहाराचे पालन करा

जर तुम्ही फूडी आहात, पण वजन कमी करायचे असेल तर खाण्याचा प्लान करा. याचा अर्थ, तिन्ही जेवणांमध्ये जड, जंक किंवा प्रक्रिया केलेले अन्न घेऊ नका. जे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.

तुमची आवड आणि आरोग्य यामध्ये समतोल राखा. केव्हाही तेलकट पदार्थ खाल्ले असतील तर पुढच्या जेवणात हिरव्या भाज्या, कोशिंबीर, फळे आणि कडधान्ये घ्या. त्यामध्ये असलेले फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT