Health Tips : रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पिण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे  Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips : रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पिण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

तुळशीचे पान चयापचय वाढवण्यास मदत करते. यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू धर्मात तुळशीला (basil) अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांचे कारण म्हणजे तुळशीत अनेक औषधी गुणधर्म (Medicinal properties) आहेत जे रोगांपासून दूर राहण्यास मदत करतात. एवढेच नाही तर आयुर्वेदातही (Ayurved) याचा वापर केला जातो. याशिवाय तुळशीच्या पानांचा वापर आरोग्यासाठी (Health) तसेच त्वचेसाठी (Skin) फायदेशीर आहे. सर्दी आणि फ्लूसारख्या आजारांवर उपचार म्हणून तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. पण तुळशीचा इतर आजारांमधील उपचार पद्धतीतही वापर केला जातो.

हे देखील पहा-

तुळशीची पाने उकळून खाल्ल्यास त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात. तुम्ही सकाळी चहा किंवा लिंबूपाण्याऐवजी तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता. तुळशीच्या पानांचे पाणी रोज रिकाम्या पोटी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते कसे बनवायचे आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.

- तुळशीच्या पानांचे पाणी कसे बनवायचे

यासाठी एका पातेल्यात एक ग्लास पाणी घालून चांगले उकळू द्या. पाणी उकळल्यावर तुळशीची पाने घाला. पाण्याचे प्रमाण निम्म्यावर येईपर्यंत हे पाणी उकळा. यानंतर, गॅस बंद करा आणि फिल्टर करा. यात तुम्ही चव वाढवण्यासाठी मध वापरु शकता.

- साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते

तुळशीचे पाणी चयापचय वाढवण्यास मदत करते. यामुळे, ते चरबी आणि कार्बोहायड्रेट बर्न करण्यास मदत होते. तसेच रक्तातील साखरेची पातळी राखते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे.

- पाचक प्रणालीसाठी चांगले

जर तुम्हाला अपचन आणि अॅसिडिटीची समस्या असेल तर रोज 2 ते 3 पाने चावून खा. याशिवाय तुळशीच्या पानांचा रस आणि लिंबाचा रस मिसळून नारळाचे पाणी प्यायल्याने पोटदुखी संपते.

- वजन कमी करते

आज प्रत्येक दुसरा व्यक्ती वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहे. कारण लठ्ठपणा इतर रोगांना आमंत्रण देतो. वास्तविक तुळशीचे पान चयापचय वाढवण्यास मदत करते. यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होते.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT