Sugarcane Juice
Sugarcane Juice Saam tv
लाईफस्टाईल

Sugarcane Juice: ऊसाचा रस पिणे आरोग्यासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांचं म्हणणं काय?

Vishal Gangurde

Side Effects of Sugarcane Juice :

उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकांना ऊसाचा रस प्यायला आवडतं. ऊसाचा सर आरोग्यासाठी फायदशीर मानला जातो. ऊसाच्या रसात मैग्नीशिअम, मॅगनीज, जिंक, आयरन, कॅल्शियम, पोटेशियम सारखे पोषक तत्वे असतात. ही सर्व पोषक तत्वे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. परंतु अधिक प्रमाणात ऊसाचा रस पिणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. (Latest Marathi News)

'न्यूज १८' च्या रिपोर्टनुसार, ऊसाचा रसाचं अधिक प्रमाणात पिण्याविषयी डॉक्टर विजय यांचं म्हणणं आहे की, 'ऊसाचा रस प्यायल्याने अनेक लाभ होतात. काही अभ्यासाच्या आधारे या रसात कॅलरीची मात्रा अधिक असते. ऊसाच्या रसात २७० कॅलरी असते. तर १०० ग्राम साखरेचं प्रमाण असतं. ऊसाच्या रसाचं अधिक प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढण्याची शक्यता आहे.

ऊसाच्या रसात कोणते तत्वे असतात?

पुढे सांगितलं की, 'ऊसाच्या रसात कॅलरी आणि साखर अधिक प्रमाणात असल्याने व्यक्तीचं वजन वाढतं. ऊसाच्या रसात पॉलिकॉसनॉल नावाचं पोषक तत्व असतं. हे तत्व रक्त पातळ करण्याचं काम करतं. तसेच यामुळे शरीरात रक्त गोठत नाही. मात्र, ऊसाच्या रसाचं अधिक प्रमाण सेवन केल्याने नुकसानदायक ठरू शकतं'.

ऊसाच्या रसाचं अधिक प्रमाणात सेवन करू नका, अन्यथा...

'पॉलिकॉसनॉलमुळे व्यक्तीला एखादी दुखापत झाल्यास मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. यामुळे ऊसाच्या रसाचं अधिक प्रमाणात सेवन करणं नुकसानदायक ठरू शकतं, असे त्यांनी पुढे सांगितलं.

ऊसाच्या रसात अँटीऑक्सिडेंट

काविळमध्ये ऊसाच्या रसाचं सेवन करणं चांगलं मानलं जातं. लिव्हर सदृढ करण्यासाठी ऊसाचा रस फायदेशीर आहे. ऊसाच्या रसामध्ये विविध प्रकारचं अँटीऑक्सिडेंट असतात. यामुळे बिलीरुबिनला नियंत्रणात आणण्यास मदत होते. काविळ झाल्यानंतर शरीरातील प्रोटीन कमी होते. अशा वेळी ऊसाच्या रसाचं सेवन केल्याने रक्तातील बिलीरुबिन वाढविण्यास मदत होते. ऊसाचा रस हा शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यात बर्निंग बसचा थरार; आगीमुळे मोठी वाहतूक कोंडी

Eknath Shinde News |मुख्यमंत्र्यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद!

Maharashtra Politics 2024 : भाजपसोबत जाण्याचा कधी आणि का घेतला निर्णय?; प्रफुल पटेलांचा पुन्हा गौप्यस्फोट

Eating Roti At Night: रात्रीच्या वेळी चपाती खाण्याचे तोटे काय

Iran News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, शोध आणि बचाव कार्य सुरू

SCROLL FOR NEXT