Yoga  Saam Tv
लाईफस्टाईल

Yoga: चाळीशीनंतर निरोगी राहण्यासाठी नियमित करा हे योगासने; आजार होतील दूर

Yoga : योगा केल्याने निरोगी आरोग्य आणि मन शांत राहण्यास मदत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Yoga Tips:

आजकाल सर्वजण आरोग्याबाबत खूप जास्त सतर्क असतात. त्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. खूप जास्त हेल्दी पदार्थ खातात. परंतु हेल्दी खाण्यासोबतच सर्वांनी योगायने, व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

वय झाल्यानंतर आरोग्याच्या अनेक समस्या वाढतात. गुडघेदुखी, हाडांच्या समस्या, चेहऱ्यावर सुरकुत्या अशा अनेत समस्या होतात. त्यामुळे खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी अंगी बालगणे महत्त्वाचे आहे. त्याचसोबत रोज व्यायाम करायला हवा.

वाढत्या वयासोबतच शारीरीक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. व्यायाम आणि योगा केल्याने निरोगी आरोग्य आणि मन शांत राहण्यास मदत होते. त्यामुळे वयाच्या चाळीशीनंतर ही योगासने करायला हवी.

गोमुखासन

गोमुखासन केल्यास शारीरिक आरोग्य सृदृढ राहते. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी गोमुखासन फायदेशीर आहे. यामुळे पाठीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते.

पद्मासन

पद्मासन केल्याने गुडघे आणि सांधे लवचिक होतात. यामुळे मन शांत राहते आणि पचक्रिया सुधारते. सर्व वयोगटातील लोक पद्मासन करु शकतात. त्यामुळे अनेक आजार दूर होतात.

अधोमुख श्वानासन

अधोमुख श्वानासन केल्याचे शरीराला खूप फायदे आहेत. चाळीशीनंतर हे योगासन नियमित करावे. यामुळे स्नायू मजबूत होतात. पचनक्रिया सुधारते आणि रक्ताभिसरण वाढते.

शवासन

शवासन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शवासन केल्याने मन शांत राहते. शवासन केल्याने दमा आजार नियं६णात राहतो. याचसोबत तणाव, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार या आजारांपासून संरक्षण होते. त्याचसोबत स्मरणशक्तीदेखील वाढते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT