New medical research may help Type 1 diabetes patients produce insulin naturally inside the body. saam tv
लाईफस्टाईल

Diabetes Treatment: डायबिटीज रुग्णांसाठी खुशखबर! आवश्यक इन्सुलिन शरीरात तयार होणार?

Diabetes Cure: मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन संशोधनात इंजेक्शनने इन्सुलिन घेण्याची गरज राहणार नाहीये. मानवी शरीरात नैसर्गिकरित्या इन्सुलिन तयार करणे शक्य होऊ शकते. काय आहे नवीन संशोधन, नेमक्या कोणत्या मधुमेह रुग्णांना याचा लाभ होईल ते जाणून घेऊ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • टाइप 1 डायबिटीजमध्ये शरीरात इन्सुलिन तयार होत नाही.

  • रुग्णांना इंजेक्शन आणि पंपाद्वारे इन्सुलिन घ्यावं लागतं.

  • नवीन संशोधनामुळे शरीरात इन्सुलिन निर्मिती शक्य होणार आहे.

देशभरात अनेकजण डायबिटीजमुळे त्रस्त आहेत. अशात टाइप 1 डायबिटीज रुग्णांच्या शरीरात इन्सुलिन निर्मिती होत नसल्यानं त्यांना इंजेक्शन आणि पंपाद्वारे वेळोवेळी इन्सुलिन घ्यावं लागतं. मात्र आता टाइप 1 डायबिटीज रुग्णांना शरीरात इन्सुलिन निर्मिती करणं सहज साध्य होणार आहे. जगभरातील 95 लाख टाइप 1 मधुमेह रुग्णांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.. टाइप 1 डायबिटीज काय आहे जाणून घेऊया.

टाइप 1 डायबिटीज हा एक असा आजार आहे. ज्यामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन इन्सुलिन तयार करणाऱ्या आयलेट पेशी नष्ट होतात. त्यामुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती होत नाही. इन्सुलिन हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे हार्मोन आहे. त्यामुळे रुग्णाला वारंवार इन्सुलिनची इंजेक्शन घ्यावी लागतात.

दरम्यान आयलेट पेशींच्या प्रत्यारोपणानंतर रुग्णांच्या शरीरात दीर्घकाळ इन्सुलिनची निर्मिती केली जाऊ शकते. याचाच आधार घेऊन स्वीडन आणि अमेरिकेतील संशोधकांनी CRISPR तंत्रज्ञान विकसीत केलंय. डायबिटीज रुग्णांच्या स्वादुपिंडातील आयलेट पेशींचे जनुकीय बदल केले. ज्यामुळे रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीला कोणताही धोका निर्माण झाला नाही. आयलेट पेशींच्या प्रत्यारोपणानंतर रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती नवीन पेशींना बाहेरील समजून त्यांच्यावर हल्ला करत नाहीत. रुग्णाच्या शरीराने या पेशींना स्वीकारले आणि त्या पेशींनी सामान्यपणे इन्सुलिन तयार केले.

सध्या आयलेट पेशींच्या प्रत्यारोपणानंतर रुग्णांना इन्सुलिनचे डोस घ्यायला लागत असले तरी संशोधक यावर अभ्यास करतायेत. भविष्यात या पेशींची परिणाम कारकता तपासून टाइप 1 डायबिटीजचं व्यवस्थापन सुलभ करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे टाइप 1 डायबिटीजच्या रुग्णांसाठी ही गोड बातमी आहे. शरीरात इन्सुलिन निर्मिती होऊन साखरेवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळविणे हा मोठा दिलासा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Down: व्हॉट्सअॅप अचानक डाऊन, सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत वाहन पलटी; १०-१२ जण जखमी... वाहनातून गणेश मूर्ती पडली

IRCTC Jyotirlinga Yatra: बम बम भोले! भारतीय रेल्वेची ज्योतिर्लिंग यात्रा, कसं कराल तिकीटाचं बुकिंग, जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती

Shirpur : सुरुंग फुटून अंगावर पडला दगड; शिरपूर तालुक्यातील जवानाला लद्दाख येथे वीरमरण

Gardening Tips : या सोप्या टिप्स वापरून घरीच उगवा हिरवीगार पालक

SCROLL FOR NEXT