Health Tips Saam TV
लाईफस्टाईल

Health Tips : 'या' व्यक्तींसाठी अंजीर फारच घातक; एक घास खाताच उद्भवतात गंभीर समस्या

Side Effects of Anjeer : अंजीर खाणे प्रत्येकच व्यक्तीच्या आरोग्यासाठी फायद्याचे नसते. काही व्यक्तींसाठी अंजीर फळ घातक देखील आहे. डॉक्टरांकडून काही व्यक्तींना अंजीर न खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

ड्रायफ्रूट्स प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी महत्वाचे असतात. त्याने शरीराला व्हिटॅमीन आणि मिनरल्स मिळतात. आपल्या हडांसाठी देखील ड्रायफ्रूट्स फार उपयुक्त असतात. सुदृढ आरोग्यासाठी काही व्यक्ती अंजिरचे सेवन करतात. अंजीर फळ ओलं आणि सुकं दोन्ही स्वरुपात मिळतं. यामध्येही महत्वपूर्ण पौष्टीक घटक असतात. मात्र अंजीर खाणे प्रत्येकच व्यक्तीच्या आरोग्यासाठी फायद्याचे नसते. काही व्यक्तींसाठी अंजीर फळ घातक देखील आहे.

त्यामुळेच आज आपण या बातमीमधून अंजीर कोणत्या व्यक्तींनी खावे आणि कोणत्या व्यक्तींनी खाऊ नये याची माहिती सांगणार आहोत.

अॅलर्जीच्या समस्या

रिसर्चमधून आलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तींना त्वचेशी संबंधित काही समस्या किंवा अॅलर्जी असेल अशा व्यक्तींनी अंजीर खाऊ नये. अंजीरचे सेवन केल्याने व्यक्तींना असलेली अॅलर्जी आणखी जास्त वाढते.

पोट दुखी आणि पोटात गॅस होणे

ज्या व्यक्तींना पोट दुखी पोटात सतत गॅस होण्याच्या समस्या आहेत त्यांनी अंजीर खाऊ नये. अंजीर खाल्ल्याने पोट दुखी आणखी जास्त वाढते. अंजीर फळ आणि सुकलेलं ड्रायफ्रूट दोन्हीही पचन्यासाठी जड असतात. त्यामुळे याचे सेवन करताना पोट फुगणे आणि दुखत राहणे अशा अडचणी येतात.

शुगरच्या रुग्णांनी

शुगरच्या रुग्णांसाठी सुद्धा अंजीर चांगले नाही असं तज्ञ सांगतात. अंजीर आपल्या रक्तातील साखरेची पातळी आणखी जास्त वाढवते. त्यामुळे या रुग्णांनी अंजीरचे अजिबात सेवन करू नये.

किडनीच्या समस्या

ज्या व्यक्तींना किडनीशी संबंधित काहीही व्याधी असतील त्यांनी अंजीर खाऊ नये. अंजीर चिकट असते. त्यामुळे ते आपल्या आतड्यांना सुद्धा चिकटून राहते. किडनीला अंजीर चिकटत असल्याने त्याचे जास्त सेवन करू नये. असे केल्याने किडनीशी संबंधीत समस्या आणखी जास्त वाढतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT