foods to avoid to prevent chronic kidney disease naturally  saam tv
लाईफस्टाईल

Kidney Health : नारळाचं पाणीही किडनीसाठी धोक्याचं? दररोजच्या आहारातील ९ पदार्थ नकळत वाढवतायत धोका

Kidney health foods to avoid : नारळाचं पाणी आणि इतर काही रोजचे पदार्थ आरोग्यासाठी चांगले वाटत असले, तरी काही वेळा ते किडनीवर अतिरिक्त ताण आणू शकतात.

Saam Tv

निरोगी राहण्यासाठी आपण अनेकदा फळे, भाज्या, नारळपाणी, दूध, सुका मेवा आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करतो. मात्र, हेच पदार्थ काही लोकांच्या किडनीच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतात, हे अनेकांना माहीत नसते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा आधीपासून किडनीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी काही पदार्थ खाताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, काही पौष्टिक पदार्थांचे अतिसेवन केल्यास किडनीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत किडनीवर ताण आणतात.

नारळपाणी, पालक, बीट आणि रताळे

नारळपाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. मात्र, त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यास शरीरातील अतिरिक्त पोटॅशियम बाहेर टाकणे कठीण होऊ शकते. त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच नारळपाणी प्यावे.तसेच, पालक, बीट आणि रताळे या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. मात्र, त्यामध्ये ऑक्सलेटचे प्रमाणही जास्त असू शकते. किडनी स्टोनचा त्रास होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींनी त्यांचे अतिसेवन टाळावे.

केळी आणि संत्री

केळी, संत्री, किवी आणि सुकामेवा यामध्ये पोटॅशियम भरपूर असते. किडनीचे कार्य व्यवस्थित नसल्यास रक्तातील पोटॅशियम वाढू शकते. त्यामुळे अशा रुग्णांनी फळांची निवड काळजीपूर्वक करावी.किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

जास्त प्रोटीनयुक्त आहार

मांसाहार, अंडी, प्रोटीन पावडर आणि व्हे प्रोटीन यांचे अतिसेवन केल्यास किडनीवर अतिरिक्त कामाचा भार पडू शकतो. विशेषतः किडनीचे आजार असलेल्या व्यक्तींनी प्रोटीनचे प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावे.

दूध, चीज आणि दही

दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असते. मात्र, त्यामध्ये फॉस्फरसही असतो. किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यास फॉस्फरस शरीरात साचू शकतो. त्यामुळे अशा रुग्णांनी दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे.

बदाम, काजू आणि बिया

सुका मेवा आरोग्यासाठी चांगला असला तरी त्यामध्ये फॉस्फरस आणि काही प्रकारांमध्ये ऑक्सलेट असते. किडनी स्टोन किंवा किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने खावीत

लोणचे आणि आंबवलेले पदार्थ

लोणचे, जास्त मीठ असलेले आंबवलेले पदार्थ रक्तदाब वाढवू शकतात. अतिरिक्त मीठामुळे किडनीवर ताण येतो.

हर्बल चहा आणि डिटॉक्स सप्लिमेंट्स

वजन कमी करण्यासाठी किंवा शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही हर्बल उत्पादनांमध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारे घटक असू शकतात. त्यामुळे शरीरातील पाणी आणि क्षारांचे संतुलन बिघडण्याचा धोका असतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे ड्रिंक्स घेणे टाळावे.

किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?

  • आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवा.

  • दिवसभर पुरेसे पाणी प्या

  • संतुलित आणि विविध प्रकारचा आहार घ्या.

  • नियमित व्यायाम करा.

  • मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Musician Death: प्रसिद्ध संगीतकाराचे ३१ व्या वर्षी निधन; झोपेतच घेतला अखेरचा श्वास, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Maharashtra News Live Update: पुण्यातील न्यायालय परिसरातील हल्ला प्रकरणात अपडेट, तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग

Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, महिन्याभरात 22 हजार रुपयांनी स्वस्त

CJP नेत्यांच्या अडचणी वाढणार; सौरभ दास, अभिजीत दीपके, आशुतोष रांकाविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी

1 Gram Gold Chain: सुंदर अन् रोजच्या वापरासाठी परफेक्ट, पाहा १ ग्रॅम सोन्याच्या चेनचे ७ स्टायलिश ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT