Padahastasana Benefits Saam TV
लाईफस्टाईल

Padahastasana Benefits : पादहस्तान एकदा करून तर पाहा; पोट, केस आणि स्किनच्या समस्या होतील छुमंतर

Health Padahastasana Benefits : पादहस्तासन आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे. पादहस्तान केल्याने आपल्याला एक नाही तर अनेक फायदे मिळतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने हे आसन केले पाहिजे.

Ruchika Jadhav

आरोग्य सुदृढ आणि निरोगी रहावं यासाठी प्रत्येक व्यक्ती विविध पद्धतीची योगासने करतात. योगासनांच्या विविध प्रकारांपैकी एक पादहस्तासन. हे आसन आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे. पादहस्तान केल्याने आपल्याला एक नाही तर अनेक फायदे मिळतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने हे आसन केले पाहिजे.

पादहस्तान केल्याने अपचनाची समस्या दूर होते. काही व्यक्तींना जेवण पचत नाही. जेवण न पचणे म्हणजे विविध आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. कारण पोट निरोगी असेल तर आपलं संपूर्ण शरीर निरोगी राहतं. अन्यथा पोट दुखी, गॅसमुळे डोके दुखी आणि स्किनच्या समस्या देखील जाणवतात. पादहस्तान अगदी साधं सोप्प आसन आहे. हे आसन करणाऱ्या व्यक्तीच्या पोटाच्या समस्या दूर होतात. त्यासह केस गळणे आणि पांढरे होणे कमी होते. तसेच मेंदूला ब्लड सक्र्यूलेशन होत असल्याने चेहऱ्यावर पिंपल्सच्या समस्या दूर होतात.

पादहस्तान करण्याचे एकापेक्षा एक फायदे

पादहस्तान केल्याने पोटावर ताण येतो. पोटातील सर्व पेशी आणि मसल्सचा सुद्धा व्यायाम होतो. त्यामुळे आंबट ढेकर, पोटात गॅस अशा समस्या असल्यास लगेचच पोट साफ होण्यासाठी मदत होते.

पादहस्तान केल्याने मानसिक ताण तणाव दूर होतो. मन शांत आणि प्रसन्न राहते. तसेच दिवसभर काम करूनही आपल्याला थकवा जाणवत नाही. शरीरातील एनर्जी वाढते.

पादहस्तान केल्याने शरीरातील रक्त शुद्ध होते तसेच सर्व अंगांना रक्त पुरवठा व्यवस्थित होतो. त्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

पादहस्तान करताना या चूका करू नका

प्रत्येक आसन करताना त्याचे काही नियम असतात. आसन चुकीच्या पद्धतीने केल्यास आपल्या आरोग्यावर त्याचा उलट परिणाम होण्यास सुरुवात होते.

सायटिकाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी पादहस्तान करू नये. त्याच्यासाठी हे घातक ठरू शकते.

ज्या व्यक्तींना स्पाईन म्हणजेच पाठीच्या मनक्यात गॅप, पाठ दुखणे या समस्या असतील त्यांनी देखील हे आसन करू नये.

काही कारणास्तव तुम्हाला थाईजमध्ये पेन होत असेल तर तेव्हा सुद्धा पादहस्तान तुमच्यासाठी आणखी त्रासदायक ठरू शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT