ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वाढत्या वयानुसार केस गळणे आणि पांढऱ्या केसांची समस्या साधारण झालेली आहे.
तसेच आजच्या काळात तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात केस गळतीची समस्या वाढत आहे.
केस गळण्याच्या समस्येवर आपण घरगुती उपचार करुन या समस्येतून सुटका करू शकतो.
कढीपत्त्याची पावडर तयार करुन तेलासोबत केसांना लावावी.
कांद्याचा रस केसांच्या टाळूवर लावल्याने केस गळतीवर फायदा होतो.
मेथीच्या बियांची पेस्ट दहीमध्ये घालून केसांना लावावी.
आपण घरच्या घरी आवळ्याची पेस्ट तयार करुन केसांना लावून ३० मिनिटांनी केस धुवावे.
केसांना झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाने मशाज केसांची वाढही होते तसेच केस दाट, मजबूत होतात.