Ayurvedic tips, Benefits of Vekhand ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

अनेक आजारांवर बहुगुणी असे वेखंड !

आजीबाईच्या बटव्यातील व आयुर्वेदातील अधिक महत्त्वाचे असे वेखंड.

कोमल दामुद्रे

मुंबई : आजीबाईच्या बटव्यातील व आयुर्वेदातील अधिक महत्त्वाचे असे वेखंड. भारतात वेखंड अधिक प्रमाणात आढळून येते. याचा सुगंध जितका हवाहवासा असतो तितकी त्याची चव कडवट व तिखट असते.

हे देखील पहा -

वेखंड हे पाणथळ व हिरव्यागार जागी आढळणारे औषधी वनस्पती आहे. वेखंडात बाष्पनशील तेल असल्याने ते पोटांचे फुगणे आणि तत्सम आजारांवर गुणकारी आहे. वेखंडामुळे पचनशक्ति वाढते. वेखंड हे पोटदुखीवर घरगुती उपाय म्हणून उपयोगी आहे. वेखंडला आयुर्वेदात विशेष असे महत्त्व आहे. बाजारात याच्या खोडाचे तुकडे मिळतात. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी औषधी वनस्पती आपल्या आरोग्यासाठी आजही कार्य करतात.भूक न लागणे, पोटदुखी, ताप, सर्दी व खोकला यासाठी अधिक फायदेशीर आहे. वेखंडच्या तेलाचा फायदा केसांसाठी देखील होतो. अनेक आजारांवर बहुगुणी अशा वेखंडचा फायदा कसा होतो हे जाणून घेऊया.

१. कोणत्याही सुजेवर आंबेहळद व वेखंड उगाळून लावल्यास सूज कमी होण्यास मदत होते.

२. मानसिक विकृती व अंगदुखीवर वेखंड चोळल्यास व त्याचे चूर्ण पाण्यासोबत घेतल्याने आपल्याला फायदा होईल.

३. पोटदुखीचा त्रास होत असल्यास ताकात वेखंडाची पूड व मीठ घालून त्याचे सेवन केल्यास पोटदुखी कमी होईल. आकडीचा त्रास होत असल्यास वेखंड, मध व वेलदोड्याचे चूर्ण खाल्ल्याने आतड्यांना आराम मिळेल.

४. भयंकर डोकेदुखी होत असल्यास वेखंड पाण्यात उगळून डोक्याला लावल्याने आराम मिळेल. युरिन साफ करण्यासाठी दूधासोबत वेखंडची पूड घेतल्यास मदत होईल. तसेच आम्लपित्त झाल्यावरही याचा फायदा (Benefits) होतो.

५. वेखंडामुळे घशातील ग्रंथी वाहून ते दम्यावर लाभकारी ठरते. यात असलेल्या त्याच्या गुणधर्मामुळे रक्ताच्या अतिसार यावर उपयोगी आहे. सांधीवातावर देखील वेखंडचा वापर फायदेशीर आहे.

६. वेखंडचा वापर हा लहानांपासून मोठ्या व्यक्तीवर देखील होतो. अनेक आजारांवर मात करण्यासाठी त्याचा फायदा होतो. वेखंड हे वात, पित्त व बाळांच्या (Baby) इतर आजारांवर फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skincare Routine: पन्नाशीतही सुंदर आणि ग्लोइंग स्किन मिळवायचीये? मग माधुरीच्या या टिप्स करा फॉलो

ऐन दिवाळीत कोल्हापुरात अघोरी प्रकार; जनावराचं काळीज पांढऱ्या कापडात बांधलं, बाजूला कुंकू, हळद अन्...

Bhau Beej 2025: बहिणींनो, भावाला ओवाळताना या चुका मुळीच करू नका, नाहीतर...

Crime: भरचौकात तरुणाला गाठलं, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; थरकाप उडवणारा VIDEO

प्रवाशांसाठी खूशखबर! कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त ४५ मिनिटांत; किती स्थानके अन् रूट कसा?

SCROLL FOR NEXT