Canola Oil
Canola Oil  Saam Tv
लाईफस्टाईल

Canola Oil : स्वयंपाकघरातील कॅनोल तेलचे शरीरास फायदे की, तोटे? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Canola Oil : आताच्या काळात आपण रोजच्या वापरत असलेल्या प्रत्येक आहाराकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. निरोगी राहण्यासाठी अनेक लोक ऑलिव्ह ऑईल चा उपयोग करतात. कॅनोल तेल उच्च पौष्टिक तत्त्वांनी समृद्ध आहे म्हणून ते वापरण्यासाठी सुरक्षित मानले जाते. हृदयाच्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी उत्तम, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.तसेच या तेलाचे काही तोटे देखील आहेत जाणून घेऊ सविस्तरपणे माहिती.

कॅनोल तेल म्हणजे काय?

वनस्पतीच्या बिया कुस्करून यापासून कॅनोल तेल तयार केले जाते. या तेलात शून्य ट्रान्स फॅट, उच्च ओमेगा - 3 ,फॅटी ऍसिड अल्फा - लिनोलेनिक ऍसिड आणि कमी संतृप्त चरबी असते. एकाग्र फायटोस्टोरॉल असते जे कोलेस्ट्रॉल शोषून घेते.

कॅनोल तेलाचे फायदे -

हृदयासाठी चांगले -

या तेलामुळे (Oil) शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल ची पातळी कमी करण्यासाठी मदत करते आणि हृदयविकाराचा धोका टाळू शकतो त्यामुळे कॅनोल तेल हृदय निरोगी (Healthy) ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. या तेलात ट्रान्स फॅट नसते आणि सॅच्युरेट फॅटचे प्रमाण खूप कमी असते.

ड्रेसिंग म्हणून देखील वापरू शकता -

कॅनोल तेल चवीला न्यूट्रल आहे. येथे कोणत्याही उत्पादनाशी जाण्यासाठी वापरले जाऊ शकते. सॅलड ड्रेसिंग साठी याचा वापर करता येतो. तळण्यासाठी आणि बेकिंग साठी देखील वापरले जाऊ शकते.कॅनोल तेल रेफ्रिजरेटर सारख्या थंड ठिकाणी ठेवल्यावरही लिक्विडफॉर्म मध्येच राहते.

त्वचेसाठी फायद्याचे -

कॅनोल तेलात व्हिटॅमिन इ आणि व्हिटॅमिन के चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्वचाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असते. त्वचेवरील सुरकुत्या,मुरूम, बारीक रेषा, डाग यासाठी आवश्यक. तेलातील फॅटी ऍसिड असल्यामुळे त्वचेला मॉइश्चरायझर करण्यास मदत मिळते.

कॅनोल तेलाचे तोटे -

कॅनोल तेलाच्या निर्मितीमध्ये उच्च उष्णता आणि रासायनिक प्रदर्शनाचा समावेश असतो. हे तेल ओमेगा - 6 ने समृद्ध आहे जे अनेक पदार्थांमध्ये उपलब्ध असते त्यामुळे शरीरातील ओमेगा - 6 चे लेव्हल वाढू शकते. जळज, लठ्ठपणा, हृदयरोग आणि अल्झायमर यासारख्या आरोग्य विषयक धोका निर्माण होऊ शकतो. या तेलामध्ये पोषक घटकांची संख्या कमी असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT