almonds benefits yandex
लाईफस्टाईल

Almond Benefits: बदाम खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Almond benefits in winter : हिवाळ्यात नियमितपणे बदामाचा आहारात समावेश केल्याने त्वचा आणि शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते. जाणून घ्या बदाम खाण्याचे काय फायदे आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने त्याचा शरीराला फायदा होतो. पण त्यातच बदाम खाणं हे शरीरासाठी अधिक फायदेशीर असतात. हे तर आपल्या सर्वांना नक्कीच माहीत आहे. बदामात भरपूर प्रमाणात प्रथिने, व्हिटामिन ई आणि अॅटींऑक्सिडेंटस असतात. त्यामुळं मेंदू तेजतर्रार होतो.

बदाम, मोनोअनसैचुरेटेड फॅटस, मॅग्नेशियम, आणि पोटॅशियमसारख्या पोषक तत्त्वांनी भरपूर असतात. जे हृदयाला स्वस्थ ठेवण्यास मदत करतात. बदामचा दैनंदिन जीवनात समावेश केल्याने त्याचा फायदा आपल्या शरीराला जास्त प्रमाणात होऊ शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती हे सांगणार आहोत.

जेणेकरून याचा तुम्हाला भरपूर फायदा घेता येईल. त्यातच हिवाळा ऋतु सुरू झाला आहे. हिवाळ्यात बदाम खाणं हे शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. बदामामध्ये असलेल्या फायबर आणि प्रोटीनमुळे शरीरातील वजन कमी होण्यास मदत होते. आणि शरीर मजबूत होते. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे मिनरल्स हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करतात. बदामातील व्हिटामिन्स आणि मिनरल्स इम्युनिटी मजबूत करतात.

बदाम खाण्याचे फायदे

बदामामध्ये कार्बोहाइड्रेटचे प्रमाण कमी असते. मात्र, फाइबर, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स अधिक प्रमाणात असतात ज्यामुळे रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रित राहते. बदामात पोटॅशियम असतो. आणि सोडियमप्रमाणे कमी असते. ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल होण्यास मदत होते. बदामाचं नियमित सेवन केल्याने शरीर स्वस्थ राहते आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते.

स्नॅक्समध्ये खाऊ शकतो बदाम

दिवसभर कामात व्यस्त असल्यामुळे भूक लागते तेव्हा नाइलाजाने काहीतरी चमचमीत खाण्याचं मन होतं. पण अनहेल्दी पदार्थ खाल्याने आपल्या शरीरावर परिणाम होतो. त्यासाठी ताजे किंवा रोस्टेड बदाम स्नॅक्समध्ये खाऊ शकतो. त्याने पोट भरून भूक मिटते आणि हिवाळ्यात शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत करते.

गरम पेयात करा बदामाचा समावेश

बदामाचा चहा किंवा दुधात टाकून सेवन करु शकतो. जेणेकरुन शरीराला बदामातील पोषक तत्वे जास्त प्रमाणात मिळतील.

बदामाचा लाडू

हिवाळ्यात बदामाचे लाडू बनवून खाऊ शकतो. हे आरोग्यासाठी अधिक लाभदायक असतं आणि शरीराला ऊर्जा प्रदान करण्याच काम करतं.

बदाम आणि मध

५ ते ६ बदाम भाजून घेऊन त्यात मध आणि तूपसह खावे. इम्युनिटी वाढवण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.

बदामाचं दूध

हिवाळ्यात गरम दूधात बदाम टाकून प्यावे. यात थोडी साखर घालून तुम्ही सेवन करू शकता. यात भरपूर प्रमाणात व्हिटामिन ई असते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited by : Priyanka Mundinkeri

Winter Makeup Tips: हिवाळ्यात लग्नानिमित्त मेकअप करताय? या गोष्टीची घ्या काळजी

Pune Crime : पुण्यात 'दृश्यम' स्टाईल' थरार, थंड डोक्याने नवऱ्याने बायकोला संपवलं; हत्याकांडाचा पहिला CCTV समोर

Maharashtra Live News Update : बिबट्यापासून बचावासाठी महिलांची अनोखी शक्कल

दिवाळीत बनवलेली शेव उरले असून मऊ झालेत? पाहा ते पुन्हा कुरकुरीत कशी बनवावे?

भीषण अपघात! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस थेट १५० फूट खोल दरीत कोसळली, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT