सध्या हिवाळ्याचा महिना सुरु झाला आहे. या महिन्यात नागरिक स्वत:च्या शरीराची विशेष काळजी घेत असतात. हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला जास्त उर्जेची गरज असते. यामुळे आपण आपल्या आहारत देखील खूप बदल करत असतो. काही नागरिक या दिवसांमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी गरम पाणी पिण्याचे सेवन करतात. हिवाळ्याच्या दिवसांत गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. तसेच अतिरिक्त जास्त गरम पाणी पिण्याचे नुकसान देखील आहे. म्हणून आज तुम्हाला गरम पाणी पिण्याचे फायदे, नुकसान आणि योग्य वेळ सांगणार आहोत.
गरम पाणी पिण्याचे फायदे
वजन कमी होते
हिवाळ्याच्या महिन्यात गरम पाणी पिल्याने आपल्या शरीराचं मेटाबॅालिज्म बूस्ट होतं, याबरोबर शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. याशिवाय सतत गरम पाणी पिल्याने आपले वजन कमी होते आणि शरीराला जास्त भूक देखील लागत नाही.
पचनक्रिया मजबूत
दररोज गरम पाणी पिण्याचे सेवन केल्याने आपली पचनक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते. याबरोबर पोटातील अन्न वेगाने पचण्यास मदत होते. म्हणून नागरिकांनी पचनक्रिया मजबूत करण्यासाठी गरम पाणी प्यायला हवे.
तणाव कमी होतो
शरीरासाठी गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील मासंपेशींना आराम मिळतो. याबरोबर आपल्याला डोकेदुखी, तणाव यांसारख्या समस्या उद्भवत नाही.
गरम पाणी पिण्याचे नुकसान
जास्त गरम पाणी शरीरासाठी घातक
नेहमी नागरिकांनी कोमट गरम पाणी प्यावे. जास्त गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील नाजूक भागांचे नुकसान होते. याबरोबर आपल्याला जळजळ,सूज आणि फोड यांसारख्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते.
शरीरातील तापमान असंतुलित होते
आपल्या शरीरासाठी जास्त गरम पाणी खूप नुकसानकारक आहे. यामुळे आपल्याला थकवा येणे, चक्कर येणे अशा समस्या निर्माण होऊ लागतात.
कमी तहान लागते
सतत गरम पाणी प्यायल्याने आपल्याला तहान देखील कमी लागते आणि शरीराची हायड्रेशन लेव्हल देखील बिघडत असते.
गरम पाणी कधी प्यावे?
आपल्या शरीरासाठी गरम पाणी नेहमी सकाळी झोपेतून उठल्यावर प्यावे. झोपेतून रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने आपले शरीर डिटॅाक्स आणि मेटाबॅालिज्म बूस्ट करण्यास मदत करत असते. याबरोबर जेवणाच्या ३० मिनिटे आधी किंवा जेवण झाल्याच्या ३० मिनिटे नंतर गरम पाणी प्यायल्याने आपली पचनक्रिया मजबूत होते. आपल्या शरीरासाठी दिवसभरातून २ ते ३ वेळा कोमट पाणी खूप फायदेशीर आहे.