Experts warn that certain habits after 7 PM can increase the risk of heart attack and cardiovascular diseases. Know which mistakes to avoid for better heart health  Saam TV
लाईफस्टाईल

Heart Attack Risk : संध्याकाळी ७ नंतर चुकूनही करू नका या ५ चुका; वाढेल हार्ट अटॅकचा धोका

avoid these 5 evening habits to reduce heart attack risk : संध्याकाळी ७ नंतर ५ सवयी सोडल्या नाहीत तर आताच अलर्ट व्हा. या सवयींमुळे हार्ट अटॅकचा धोका आणखी वाढतो. जाणून घ्या

Saam Tv

वाईट सवयींमुळं हेल्दी डाएटवर परिणाम

हार्ट अटॅकनं मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय. हा धोका कमी करण्यासाठी लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या संबंधित सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला जातो. पण संध्याकाळी ७ नंतर चुकून केल्या गेलेल्या चुका या तुमच्या हेल्दी लाइफस्टाइल आणि डाएटवर पाणी फेरतात.

ब्लड प्रेशर, मेटाबॉलिक अॅक्टिव्हिटी मंदावते

एक्स्पर्ट्सच्या माहितीनुसार, संध्याकाळी ७ नंतर तुमच्या शरीराचं सरकार्डियन रिदम (मानवी शरीराचं नैसर्गिक चक्र) रिकव्हरी फेजमध्ये जातं. ब्लड प्रेशर, मेटाबॉलिक अॅक्टिव्हिटीची गती मंदावते. शरीराच्या या चक्राला अडथळे आले तर कार्डियोवॅस्कुलर सिस्टमवरील ताण वाढतो.

धोका वाढतो

जेव्हा तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज असते तेव्हा तुम्ही काय करता? संध्याकाळनंतर शरीराला हानीकारक ठरणाऱ्या वाईट सवयी हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि कार्डियोवॅस्कुलर हेल्थचा धोका वाढवतात.

रात्रीचं जेवण जास्त प्रमाणात करणं

दिवसा जेवल्यानंतर रात्रीचंही जेवण अधिक प्रमाणात करत असाल तर ही सर्वात वाईट सवय आहे. रात्री जास्त जेवलात तर तुमची पचनशक्ती कमी होऊ शकते. परिणामी तुमच्या हृदयाच्या पंपिंग सिस्टममध्ये अडथळे येतात. तसेच ब्लड प्रेशर रेग्युलेट होण्यासही अडथळे वाढण्याचा धोका असतो.

संध्याकाळनंतर कॉफी पिणे

ऑफिसहून घरी परतल्यानंतर संध्याकाळी आपण फ्रेश होण्यासाठी कॉफी पितो. कॉफीमधील घटक कॅफिन हे नर्व्हस सिस्टमला स्टिम्युलेट करते आणि त्यामुळे हार्ट रेट वाढतात, परिणामी तुमची स्लीप सायकल डिस्टर्ब होते. झोप खराब झाल्यामुळं कार्डियोवॅस्कुलरवर परिणाम होतो. तसेच हायपरटेन्शनचा धोकाही वाढू शकतो.

रात्री उशिरा स्नॅक्स खाणं

रात्री जेवणानंतर तुम्ही उशिरा स्नॅक्स खाताय तर आताच सावध व्हा. रात्री उशिरा असे पदार्थ खाल्ल्यास तुमच्या आरोग्याला हानीकारक ठरू शकतात. चिप्स, गोड पदार्थ किंवा प्रोसेस्ड फूडचे सेवन करणे टाळले पाहिजे.

रक्तातील साखर अचानक वाढते

रात्री उशिरा स्नॅक्स खाल्ल्याने अचानक रक्तातील साखर मोठ्या प्रमाणात वाढते. अनहेल्दी फॅट्स आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. असे हानीकारक पदार्थ नियमितपणे खाल्ले तर कार्डियोवॅस्कुलर सिस्टमवर ताण वाढतो.

अतिरिक्त ताण

ऑफिसमधून घरी गेल्यानंतरही कामाचा ताण किंवा इतर गोष्टींचा ताण घेतला तर तो आरोग्यास धोकादायक ठरतो. तुमच्या हृदयावर त्याचा हळूहळू परिणाम होऊ लागतो.

टीप : ही माहिती वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. कुठलाही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: -चांदवड टोलनाका अपघात विभागातील ७५ कामगारांच्या नोकरीवर कुऱ्हाड, संतप्त कर्मचाऱ्यांनी सुरु केले साखळी उपोषण

PAN कार्डधारकांसाठी मोठा बदल! पैसे काढण्यासाठी नव्या अटी अन् नवे नियम लागू

सात महिन्यापासून मुलीचा शोध लागेना! हतबल आई-वडिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न

Petrol Pump Business: पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी काय काय लागतं? जाणून घ्या खर्च, शिक्षण आणि वयोमर्यादा

Dhule Crime : दुहेरी हत्याकांडानं धुळे हादरलं! बायकोसमोर अपमान केला म्हणून मुलानं आई-वडिलांची केली हत्या

SCROLL FOR NEXT