Liver disease symptoms saam tv
लाईफस्टाईल

Liver disease symptoms: लिव्हर खराब होत असल्यास तुमच्या त्वचेवर दिसतात 4 लक्षणं; शरीरात दिसणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Skin signs of liver disease: त्वचेचा रंग बदलणे, कारण नसताना सतत खाज येणे, वारंवार निळे डाग पडणे किंवा कोळ्याच्या जाळ्यासारख्या लाल रक्तवाहिन्या दिसणे ही काही वेळा लिव्हरच्या समस्यांची चिन्हं असू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरात काही बिघाड झाला तर त्याचे संकेत शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर दिसू शकतात. त्यात त्वचेचाही समावेश होतो. त्वचेवर होणारे काही बदल साधारण असू शकतात. मात्र त्वचेचा रंग बदलणं, कारण नसताना सतत खाज येणं किंवा वारंवार निळे डाग पडणं यासारखी लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण काही वेळा ही लक्षणं लिव्हर म्हणजेच यकृताशी संबंधित आजारांची सुरुवातीची चिन्हं असू शकतात.

लिव्हर आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील घातक पदार्थ बाहेर काढणं, अन्न पचवण्यास मदत करणं, शरीरासाठी आवश्यक पोषक घटक साठवून ठेवणं आणि शरीरातील चयापचयाची प्रक्रिया व्यवस्थित ठेवणं अशी अनेक कामं लिव्हर करतो.

फॅटी लिव्हर, जास्त प्रमाणात मद्यपान, लठ्ठपणा, व्हायरल हेपेटायटिस आणि काही औषधांमुळे लिव्हरच्या कामावर परिणाम होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये लिव्हरचा त्रास झाल्याचे संकेत सर्वात आधी त्वचेवर दिसून येतात.

त्वचा आणि डोळे पिवळे होणं

लिव्हरच्या आजारांमध्ये कावीळ म्हणजेच Jaundice हे सर्वात ओळखण्यासारखं लक्षण मानलं जातं. आपल्या शरीरातील जुन्या लाल रक्तपेशी तुटल्यानंतर बिलिरुबिन नावाचा पिवळ्या रंगाचा घटक तयार होतो. निरोगी लिव्हर हे बिलिरुबिन शरीरातून योग्य पद्धतीने बाहेर जाण्यास मदत करतो. मात्र लिव्हरचं काम व्यवस्थित होत नसेल तर बिलिरुबिन रक्तात वाढू शकतं.

कोणतेही कारण नसताना सतत खाज येणं

शरीरावर कोणतीही पुरळ किंवा त्वचेचा आजार नसताना अनेक आठवडे किंवा महिने सतत खाज येत असेल, तर काही वेळा त्याचा संबंध लिव्हरच्या आजाराशी असू शकतो. ही खाज शरीराच्या एखाद्या भागात किंवा संपूर्ण शरीरावर येऊ शकते. याशिवाय अनेकांना रात्रीच्या वेळी जास्त वाढू शकते.

कारण नसताना शरीरावर निळे डाग पडणं

रक्त गोठण्यास मदत करणारी काही महत्त्वाची प्रोटीन लिव्हर तयार करतं. लिव्हरच्या कामात बिघाड झाल्यास रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. अशावेळी अगदी किरकोळ अपघातानंतर निळे डाग पडू शकतात. कोणतंही कारण नसताना वारंवार शरीरावर निळे डाग दिसू शकतात. अशी लक्षणं वारंवार दिसत असतील तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

त्वचेवर कोळ्याच्या जाळ्यासारख्या लाल रक्तवाहिन्या दिसणं

काही लिव्हरच्या आजारांमध्ये त्वचेवर Spider Angiomas म्हणजेच कोळ्याच्या जाळ्यासारख्या दिसणाऱ्या छोट्या लाल रक्तवाहिन्या दिसू शकतात. हे लक्षणं प्रामुख्याने चेहऱ्यावर, मानेवर, छातीवर, खांद्यावर दिसू शकतात.

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काय कराल?

  • लिव्हरचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या जीवनशैलीत काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

  • आहारात फळे, भाज्या, पूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त प्रथिने असलेले पदार्थ घ्या.

  • वजन नियंत्रणात ठेवा.

  • मद्यपान कमी करा किंवा शक्य असल्यास पूर्णपणे टाळा.

  • नियमित व्यायाम करा.

  • मधुमेह आणि शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर योग्य उपचार आणि नियंत्रण ठेवा.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पिकांची केली पाहणी

Alibag Fort : अलिबागला गेल्यावर 'हा' ३०० वर्षे जुना समुद्री किल्ला पाहाच, ओहोटीच्या वेळी चक्क चालत जाता येतं

Oil Price : खाद्यतेलाच्या दरांबाबत केंद्राचा मोठा निर्णय; कंपन्यांना MRP कमी करण्याचे निर्देश

Onion Oil Vs Rosemary Oil: कांद्याचे तेल की रोझमेरी तेल, केसांच्या वाढीसाठी कोणते तेल फायदेशीर?

PSI ची हत्या, ठाण्यातील कुख्यात गुंडाला अटक; महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT