Headache Home remedies  Saam Tv
लाईफस्टाईल

Headache Home remedies : तुमचे देखील वारंवार डोके दुखते ? 'हे' काही घरगुती उपाय करून पाहा

थोडीशी धावपळ झाली की आपले डोके दुखायला लागते.

कोमल दामुद्रे

Headache Home remedies : बदलत्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो त्यातील एक म्हणजे डोकेदुखी. थोडीशी धावपळ झाली की आपले डोके दुखायला लागते.

डोकेदुखीचा त्रास सर्वांनाच कधी ना कधी होत असतो. अशा वेळेस आपण पेनकिलर खातो परंतु, सतत पेन किलर खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. चला तर मग जाणून घेऊया डोकेदुखीचे नक्की कारण काय आणि त्यावरील घरगुती उपाय.

डोकेदुखीचे कारण काय?

झोपेची कमतरता,गॅस, अपचन, तणाव, सर्दी (बंद नाक), अतिआमलता या काही कारणांमुळे डोकेदुखीचा त्रास होत असतो. त्यावर पेनकिलर घेणे हा योग्य पर्याय नाही त्यासाठी तुमच्या स्वयंपाक घरातील (Home Remedies) गोष्टींचा वापर करून डोकेदुखी तुम्ही थांबवू शकता.

डोकेदुखीवर घरगुती इलाज

1. पाणी प्या

तुम्हाला आश्चर्य वाटले असेल पण शरीरातील डिहायड्रेशन म्हणजेच पाणी कमी झाल्यामुळे बऱ्याच वेळा डोकं दुखत असते. त्यामुळे अशा वेळेस पाणी (Water) प्यायल्याने तुमची डोकेदुखी लगेच थांबते तुम्ही दररोज भरपूर पाणी प्यायल्याने निरोगी राहाल.

2. लिंबू पाणी

तुमचे डोकं खूप दुखत असेल तर लिंबू पाण्यात जरा मीठ टाकून प्यायला पाहिजे. आपल्या शरीरातील आम्लाचे प्रमाण कमी झाल्यावर डोकेदुखी होते लिंबूमध्ये ऍसिड असल्यामुळे अशा वेळेस डोकेदुखी लगेच थांबते.

Headache

3. लवंग

गरम तव्यावर लवंग गरम करून गरम गरम लवंग एका रुमालात बांधून लवंगाचा वास घेतल्याने डोकेदुखी थांबते. लवंग आपल्या घरात सहज मिळते त्यामुळे तुम्ही हा उपाय अगदी सहज करू शकाल.

4. आल्याचा चहा

आल्याचा काळा चहा प्यायल्याने डोकेदुखी थांबते. काळा चहा बनवत असताना त्यामध्ये ४/५ तुळशीचे पान आणि काळीमिरी टाकून चहा छान शिजवून घ्या. यामुळे तुमची डोकेदुखी बंद होण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahrukh Khan Real Name: किंग खानचे खरं नाव शाहरुख नाही तर 'हे' आहे; तुम्हाला माहितीये का?

Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

Modi-Jinping: भारत-चीनमध्ये होणार नवी सुरुवात? रशियानंतर आता ब्राझीलमध्ये होऊ शकते मोदी-जिनपिंग भेट

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

SCROLL FOR NEXT