मयुरेश कडव, साम प्रतिनिधी
मुंबई: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन चमत्कार पाहाय़ला मिळतायेत. माणसाच्या मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग झाल्यानंतर आता नवा चमत्कार होणारंय. आता माणसाच्या हृदयाप्रमाणे त्यांचं डोकंही ट्रान्सप्लांट होऊ शकतं. या नव्या तंत्रज्ञानामुळे माणूस अमर होऊ शकतो असाही दावा केला जातोय. पाहूयात या व्हायरल बातमीमागचं नेमकं सत्य काय ?
आतापर्यंत तुम्ही किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांटबद्दल ऐकलं असेल...इतकच काय लिव्हर ट्रान्सप्लांटद्वारे अनेकांचा जीव वाचल्याची उदाहरणं पाहिली असतील. मात्र आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा नवा चमत्कार पाहायला मिळणार आहे. लवकरच माणसाचं डोकंदेखील बदलता येणार आहे. अमेरिकेतील न्युरोसायन्स आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग स्टार्टअप ब्रेनब्रिजनं यासाठी हेड ट्रान्सप्लांट तंत्रज्ञान विकसित केलंय. या तंत्रज्ञानामुळे कोणत्याही व्यक्तीचं डोकं दुसऱ्या व्यक्तीच्या शरिराला जोडलं जाऊ शकतं, असा दावा केला जातोय. या तंत्रज्ञानाची खासियत म्हणजे डोक्याशिवाय माणसाचा मणकाही दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराला जोडला जाईल.
अमेरिकेतील स्टार्टअप ब्रेनब्रिजनं हे तंत्रज्ञान विकसीत केलंय. हेड ट्रान्सप्लांटसाठी AI मशीनचा वापर करण्यात आलाय. AI द्वारे आधी एका व्यक्तीचं डोकं ब्रेन डेड रूग्णाच्या शरीरात फीट केलं जातं. ही AI आणि मॉलिक्युलर लेव्हल इमेजिंगच्या मार्गदर्शनात ही शस्त्रक्रिया यशस्वी केला जाईल असा ब्रेनब्रिजचा दावा आहे.
तांसू येगेन नावाच्या सोशल मीडिया युजरनं या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडीओ शेअर केलाय. पुढच्या 8 वर्षात प्रत्यक्षात हेड ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेला सुरूवात होईल असा दावाही करण्यात आलाय. मात्र अशाप्रकारे खरंच एका व्यक्तीचं डोकं दुसऱ्या वक्तीच्या शरीराला जोडता येतं का? या दाव्याला नामांकित डॉक्टर्स किंवा वैद्यकीय क्षेत्रातील बड्या संस्थांनी दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे तुर्तास हे संशोधन प्रत्यक्षात केव्हापर्यंत येईल, हे सांगणं कठीण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.