Heart Problem : चिरफाड न करता बदलली हृदयाची झडप; ७२ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

heart disease : कोमॉर्बिडीटीज, दोन (स्ट्रोक) आणि दोन अँजिओप्लास्टी झालेल्या ७२ वर्षीय वृध्द महिलेवर यशस्वी उपचार करण्यात आले. मीरारोड च्या वोक्हार्ट रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली.
Heart Problem
Heart ProblemSaam Digital
Published On

Heart Problem

कोमॉर्बिडीटीज, दोन (स्ट्रोक) आणि दोन अँजिओप्लास्टी झालेल्या ७२ वर्षीय वृध्द महिलेवर यशस्वी उपचार करण्यात आले. मीरारोड च्या वोक्हार्ट रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली. या रुग्णावर ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) प्रक्रिया करण्यात आली. टीएव्हीआर शस्त्रक्रिया रोगग्रस्त महाधमनी (एओर्टिक) व्हॉल्व्ह रोपण करण्यासाठी केली जाते. ही आधुनिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची विनाटाक्यांची शस्त्रक्रिया आहे. यामध्ये ओपन हार्ट सर्जरी करायची आवश्यकता नसते.

हीरा मिश्रा यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यानंतर त्यांच्यावर दोन अँजिओप्लास्टी केल्या. सातत्याने आलेल्या स्ट्रोकमुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली. तपासणीअंती तिच्या हृदयाची महाधमनी व्हॅाल्व्ह अरुंद झाल्याचे दिसून आले. तिला चक्कर येणे, रक्तदाब कमी होणे आणि श्वासोच्छवासासंबंधी त्रास होऊ लागला. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यावर तावी ही शस्त्रक्रिया केली गेली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Heart Problem
Court News : लिंबूसाठी मध्यरात्री महिलेच्या घराचं दार ठोठावणं योग्य आहे का? कोर्ट काय म्हणालं?

इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अनुप ताकसांडे यांनी सांगितले की, या रुग्णाची प्रकृती गंभीर होती. कमी रक्तदाब व श्वासोच्छवास आणि चक्कर येणे अशी गंभीर लक्षणे दिसून येत होती. महाधमनी वाल्व्ह अरुंद होत होता. रुग्णाला एओर्टिंक स्टेनोसिस असल्याचे निदान झाले. या स्थितीमध्ये महारोहिणीच्या झडपेच्या झापा काही अडथळ्यामुळे नीट उघडत नाहीत. कोरोनरी आर्टरी डिसीज, स्ट्रोक आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज यांसारख्या कॉमोरबिडीटी असलेल्या ६५ वर्षांवरील वृद्धांमध्ये ही स्थिती दिसून येते. ६५ वर्षांवरील लोकसंख्येपैकी सुमारे ०.५% ते १% टक्के लोकांना कॅल्सिफिक एओर्टिंक वाल्व्ह स्टेनोसिसचा त्रास होतो.

Heart Problem
Pune News : दुभाजक तोडून दोन भरधाव ट्रक समोरासमोर धडकले; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com