Morning Walk Mistakes Fatal saam tv
लाईफस्टाईल

Walking tips: नव्या वर्षात दररोज 10 हजार पावलं चालण्याचा संकल्प केलाय? या ५ सोप्या टीप्सने पूर्ण करा रोजचा काऊंट

New year fitness resolution: नववर्षाच्या सुरुवातीला अनेकजण आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प करतात. दररोज १०,००० पावले चालणे हा सर्वात लोकप्रिय फिटनेस संकल्प आहे. डॉक्टरांच्या मते, नियमित चालण्यामुळे हृदय आरोग्य सुधारते, वजन कमी होते आणि ताण कमी होतो.

Surabhi Jayashree Jagdish

प्रत्येक व्यक्तीला त्याचं फिटनेस जपायचं असतं. आता नवीन वर्ष सुरु होणार असून आपल्यापैकी काहींनी फिटनेसबाबत काही संकल्प केले असतील. यापैकी काहींनी दिवसाला १० हजार पावलं चालण्याचा संकल्प केला असेल. अनेकजण सुरुवातीला हा संकल्प पूर्णही करतील. मात्र जसे जसे दिवस जातील तसा हा संकल्प मागे पडत जाईल. मात्र तुम्हाला हा संकल्प पूर्ण करायचा असेल तर एक ट्रीक तुमची मदत करू शकते.

जर तुम्ही पहिल्यांदा १० हजार पावलं चालण्याचा संकल्प केला असेल तर आम्ही एक तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार आहोत. दररोज १० हजार पावलं चालण्याने आपल्या शरीराला खूप फायदे होतात. यामुळे जर तुमच्या शरीरात कुठे वेदना असतील तर त्या कमी होतात आणि डिप्रेशनचा धोका कमी होतो.

दररोज दहा हजार पावलं चालण्याचा फायदा?

  • अनेक अभ्यासांच्या माध्यमातून असं समोर आलं आहे की, दररोज पायी चालण्याने हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे ब्रेस्ट आणि कोलोन कॅन्सरचा धोकाही कमी होतो.

  • आर्थरायटिस म्हणजेच संधिवाताचा ज्या व्यक्तींना त्रास असतो त्यांचा हा त्रास कमी होतो.

  • २०२२ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, दररोज पायी चालल्यामुळे गुडघेदुखी कमी होतो.

  • २०२४ मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, जर तुम्ही दररोज न चुकता पायी चालत असाल तर पाठीच्या दुखण्याचा त्रास कमी होतो.

सेंट्रल ऑफ डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, दररोज १० हजार पावलं चालणं नाही झालं तरी चालेल. मात्र दर दिवसाला केवळ ३० मिनिटं चालणं देखील तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. त्यानुसार दिवसाला ७ ते ८ हजार पावलं तुम्ही चालू शकता.

दिवसाला तुम्ही १० हजारांच्या जवळपासचा टप्पा कसा गाठू शकता?

  • पार्किंगमध्ये गाडी काही अंतर दूर लावा आणि त्यानंतर चालत या.

  • एका ठिकाणी बसून फोनवर बोलू नका. फोनवर बोलताना चाला.

  • घरात ट्रेडमिल असेल तर ईमेल किंवा फोनवरची मिटींग करताना त्यावर १० मिनिटं चाला.

  • दुपारच्या जेवणानंतर छोटी फेरी मारा.

  • जर तुमचा कोणी मित्र असेल तर त्याच्यासोबत पायी चालायला जा. यामुळे तुम्हाला सोबत मिळेल.

दररोज १० हजार पावलं चालण्यासाठी किती वेळ लागतो?

  • सरासरी लागणारा वेळ- 1.5 ते 2.5 तास

  • पेस २ mph- धीम्या गतीने चालत असाल कर २.५ तास लागू शकतात.

  • पेस ३ mph- मध्यम गतीने चालत असाल तर ९० मिनिटं ते २ तासांचा कालावधी लागू शकतो.

  • पेस ४ mph: वेग वाढवून जलग गतीने चालत असाल तर ९० मिनिटांचा कालावधी लागू शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana: झेंडावंदनाची तयारी करताना मुख्याध्यापकाचा मृत्यू, शाळेच्या प्रांगणात जागीच सोडले प्राण

Marathi Movie: प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफली अभि–कृतिकाची केमिस्ट्री; 'लग्नाचा शॉट'मधील 'रेशमी बंध' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Budget 2026: सोने-चांदीचे दर स्वस्त होणार? अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात झेंडावंदनाची तयारी करत असतानाच मुख्याध्यापकाचा धक्कादायक मृत्यू

Blood Pressure: BP अचानक वाढतोय? घरीच करा रोज २ मिनिटे 'हा' व्यायम, मिनिटांत मिळेल आराम

SCROLL FOR NEXT