Relationships Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationships Tips : तुम्ही चुकीच्या पार्टनरची निवड केली आहे? हे संकेत दिसताच माघार घ्या

Ruchika Jadhav

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जोडीदाराला जास्त महत्व असतं. अनेकदा जोडीदार चुकीचा निघाला की आपल्या भावानांचा भंग होतो आणि आपण डिप्रेशनमध्ये जातो. नात्यात पार्टनकडून प्रत्येक व्यक्तीच्या फार अपेक्षा असतात. तसेच पती-पत्नी किंवा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड या नात्याची एक वेगळी स्पेस असते. सतत होणाऱ्या भांडणांमुळे हे नातं संपवावं असं अनेकदा मनात येतं.

मात्र नातं संपवण्यापेक्षा आपण अनेकदा पार्टनरच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो किंवा त्यांना माफ करतो. असे केल्याने नात्यात काही क्षणांसाठी आनंद राहतो आणि पुन्हा पार्टनरकडून त्याच गोष्टी घडतात, त्यामुळे अशी नाती कितीही जुळवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तुटून जातात. त्याचे काही संकेत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पहिला संकेत

नात्यात सुरुवातीला भरपूर प्रेम असतं. मात्र हे प्रेम विश्वासावर टिकलेलं असतं. तुमच्या पार्टनरबद्दल तुमच्या मनात जराही डाउट आला तर लगेचच त्याची शहानीशा करा. पार्टनर सतत तुम्हाला खोटं सांगत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आंतरमनाचं ऐका आणि योग्य तो निर्णय घ्या. अशा व्यक्तीबरोबर नातं जास्त दिवस वाढवणे योग्य नसते.

दुसरा संकेत

प्रत्येक नातं हे दोघांमध्ये होणाऱ्या संवादावर टिकलेलं असतं. पार्टन तुमच्याशी लॉयल असेल तर काही झाले तरी आणि कितीही व्यस्त जीवन असले तरी तो तुम्हाला वेळ देईल. जर पार्टनर तुम्हाला वेळ देत नसेल, सतत काही कारणे सांगून तुमच्यापासून दूर जात असेल तर ही गंभीर बाब आहे. तसेच याने स्पष्ट होते की तुम्ही चुकीच्या पार्टनरची निवड केली आहे.

तिसरा संकेत

प्रत्येक नातं विश्वासासह मान आणि सन्मान यावर टिकलेलं असतं. जर तुमचा प्रियकर तुमचा सतत अपमान करत असेल तुम्हाला अजिबात मान सन्मान देत नसेल तर त्याचं तुमच्यावर काहीही प्रेम राहिलेलं नाही हे समजून जा. अशा पार्टनरबरोबर राहणं अजिबात चांगलं नसतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP MLA Slapped in lakhimpur : ...अन् पोलिसांसमोरच भाजप आमदाराला मारहाण, थेट थोबाडीत लगावली; नेमकं काय घडलं? VIDEO

Bhumi Pednekar: भुमीचं साडीतलं सौंदर्य पाहून 'दिलात झापुक झुपुक राहतय गं'

Solapur News : टोल न देता बॅरिकेड्स तोडून निघालेल्या ट्रकने सुरक्षा कर्मचाऱ्याला चिरडलं; पेनूर टोलनाक्यावरील घटना

Maharashtra Politics: 'राज्याची चिंता सोडा, मविआ टिकेल का याची काळजी करावी', विखे पाटलांचा नाना पटोलेंना खणखणीत टोला

Marathi News Live Updates: सोमवारपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT