ब्रेकअपनंतर कधीही सोशल मीडियाचा आधार घेऊन कनेक्ट राहू नये. यामुळे अजून नात्यात कटूता येते. सर्वच गोष्टी स्टेटसला टाकणे गरजेचे नसते.
ब्रेकअपनंतर नंतर थोडा वेळ घ्या लगेच दुसऱ्या व्यक्तीला डेट करू नका. वेळ घेतलात तर तुम्हाल खऱ्या अर्थाने तुमच्या जोडीदाराची किंमत कळेल आणि तुम्ही पॅचअपसाठी प्रयत्न कराल.
पॅचअप करण्यासाठी मुख्य ब्रेकअपच कारण समजून घेतल पाहिजे आणि त्यानुसार आपल्यात सुधारणा केली पाहिजे.
कोणत्याही गैरसमजातून ब्रेकअप झाला असेल तर तो गैरसमज शांतपणे दूर करणे खूप गरजेचे असते. नाहीतर आयुष्यभरासाठी नाते गमवावे लागेल.
पॅचअप करायचा असल्यास त्या व्यक्तीला त्रास होणार नाही अशा पद्धतीने सतत तिच्याशी बोलत रहा. तिला टाळू नका. यामुळे नात्यात अजून दरी येईल.
नात पुन्हा जोडण्यासाठी समोरच्या व्यक्तीवर जबरदस्ती करू नका. कारण अशा नात्याचा काही उपयोग नाही. त्याला मनापासून तुमच्यासाठी भावना वाटल्या पाहिजेत.
ब्रेकअपनंतर वाईट सवयींच्या नादाला लागून जोडीदाराला त्रास देऊ नका. कारण एखाद वेळी राग शांत झाल्यावर बोलणारी व्यक्ती सुद्धा तुमची अशी वर्तणूक पाहून पुन्हा नातं जोडणार नाही.
ब्रेकअप ही गोष्ट आपल आयुष्य बदलू शकते. त्यामुळे याचा विचार खूप काळजी पूर्वक करावा. कोणत्याही रागाच्या भरात ब्रेकअपचा निर्णय घेऊ नये.
तुम्ही जर रागात ब्रेकअप केला असेल तर वेळीच शांत होऊन जोडीदाराशी संवाद साधा. नाहीतर खूपच उशीर होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.