Hartalika 2023 Puja List Saam Tv
लाईफस्टाईल

Hartalika 2023 Puja List : पहिल्यांदाच हरतालिकेच व्रत करताय? पूजेत या गोष्टींचा नक्की समावेश करा, पाहा यादी

Hartalika Puja Tithi : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरातालिका व्रत साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

Hartalika Puja Date :

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरातालिका व्रत साजरा केला जातो. यंदा हा व्रत १८ सप्टेंबरला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया दीर्घायुष्य आणि पतीच्या अखंड सौभाग्यासाठी व्रत आणि पूजा करतात. त्याचबरोबर कुमारीका देखील हे व्रत करतात.

हे व्रत भगवान शिव आणि देवी पार्वतीसाठी केले जाते. या दिवशी स्त्रिया पूजेसाठी सोळा शृंगार करतात. जर तुम्ही देखील पहिल्यांदा हरतालिकेच व्रत करणार असाल तर पूजेच्या साहित्यात या गोष्टींचा समावेश नक्की करा

1. हरतालिका तीज शुभ मुहूर्त

पंचागानुसार, तृतीया तिथी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11:08 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12:39 पर्यंत असेल. परंतु हे व्रत (Vrat) सोमवारी १८ सप्टेंबरला केले जाईल. सकाळी ६ ते रात्री८.२४ पर्यंत पूजेसाठी योग्य वेळ आहे.

2. हरतालिका तीज पूजेचे साहित्य :

  • नारळ, कलश, बेलपत्र, शमीची पाने, केळीचे पाने, धतुर्‍याचे फळ, तूप, मध, गुलाल, चंदन, अत्तर, पाच फळे, सुपारी, अक्षता, धूप, दीप, कापूर, गंगाजल, दुर्वा आणि जनेयू इ.

  • या व्रतात देवी पार्वतीला टिकली, सिंदूर, कुंकू, मेहंदी, काजळ, बांगड्या आणि कंगवा या गोष्टी अर्पण केल्या जातात.

3. हरतालिका तीज व्रताचे नियम (Rules)

  • व्रत करताना या दिवशी चुकूनही पाणी (Water) पिऊ नका.

  • या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची मनोभावे पूजा करावी.

  • या दिवशी तूप, दही, साखर (Sugar), दूध आणि मध यांचे पंचामृत अर्पण करावे.

  • दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करून उपवास सोडावा.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT