Hartalika Puja List 2024  Saam TV
लाईफस्टाईल

Hartalika Puja List 2024 : वर्षभर डोक्यावर हरितालिकेचा आशिर्वाद राहिल; 'या' पद्धतीने करा पुजा

Hartalika Puja Sahitya And Puja Mandani: हरतालिकेचा उपवास सुवासिनी आणि मुली करतात. हे व्रत सुवासिनी नवऱ्याला चांगलं आयुष्य मिळावं आणि मुली शंकरासारखा जोडीदार मिळावा म्हणून करतात.

Ruchika Jadhav

भाद्रपद महिना आला म्हणजे गणेशोत्सवाची तयारी सुरू होते. सर्वांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन होणार असतं. येत्या ७ सप्टेंबरला बाप्पा घरोघरी विराजमान होणार असल्याने बाजारात सर्वत्र गर्दी पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका असते. या दिवशी हरतालिकेचा उपवास सुवासिनी आणि मुली करतात. हे व्रत सुवासिनी नवऱ्याला चांगलं आयुष्य मिळावं आणि मुली शंकरासारखा जोडीदार मिळावा म्हणून करतात.

हरितालिकेचं हे व्रत सर्व स्त्रियांसाठी खूप महत्वाचं आहे. पुजा करताना स्त्रिया व कुमारीका पार्वतीला बोलतात की, तुला जसा वर हवा होता तसाच आम्हाला ही मिळू दे आणि अखंड सौभग्य लाभू दे, अशी प्रार्थना करतात. या दिवशी हरितालिकेची पूजा करुन झाल्यानंतर रात्रभर जागरन केलं जातं. महिला रात्री फुगडी, झिम्मा, गोफ असे खेळ खेळतात आणि मज्जा करतात.

या व्रतामध्ये आपण पुजेची मांडणी कशी करावी हे जाणून घेणार आहोत.

साहित्य

तुळस, विड्याची पाने १२, फळे, दूर्वा, फुले, २नारळ, पेढे, बदाम, शहाळे, खारका, खडीसाखर, सुपऱ्या इत्यादी.

हरितालिकेच्या पुजेचं साहित्य

पार्वती मातेच्या दोन मूर्ती आणि शिवलिंग, चंदनगंध, गुलाल, अक्षदा, हळदकुंकू, उदबत्ती, कापूर, रांगोळी, आसन , शंख, समई, पाण्याचा कलश, देव पुसण्याचे वस्त्र, चौरंग /पाट,कापूरराती, कापसाची वस्त्रे, नाणी, ताम्हण ,आगपेटी, थोडसे तांदूळ, नैवेद्य, गुळखोबरं, पंचामृत.

फुलं आणि फळं

मधुमासती, चाफा, धोतरा, जाई, बेल, रुई, आबां , केळी, डाळिंब, पेरु. [आपल्या सोयीप्रमाणे]

सौभाग्यवाण

तम्हाण किंवा ताटात- वस्त्र, नारळ, गजरा, वेणी, काजळ,आरसा, फणी, बांगड्या, हार, हळदकुंकू, तांदूळ, सुपारी , नाणे, इत्यादी

हरितालिकेच्या पुजा विधीची मांडणी कशी करावी ?

हरितालिकेचं व्रत आपण ज्या ठिकाणी किंवा ज्या जागी करणार आहोत ती जागा स्वच्छ असावी. केळीच्या खांबांनी चौरंगाच्या चारही बाजू बांधा.

हरतालिकेची पूजा करताना सकाळची वेळ चांगली असते. सकाळी लवकर स्नान करुन चांगले कपडे परिधान करा.

पूजा सुरु करताना पूजेचं महत्तवं सांगावं.

पूजा ज्या ठिकाणी मांडायची आहे, त्या जागी पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर वस्त्र टाकावे.

त्या टाकलेल्या वस्त्रावर तांदळाने सपाट ढिग तयार करुन गौरी व हरितालीची मूर्ती ठेवा. त्याच मूर्ती समोर वाळूचे लिंग तयार करा.

तुम्ही तुमच्या प्रथेप्रमाणे ही पूजेची मांडणी करु शकता.

तांदूळ ठेवलेल्या ठिकाणी सुपारी किंवा नारळ ठेवून उजव्या बाजूस गणपती मांडावा.

त्या समोर पाच विड्यांची पाने मांडून तिथे नाणी, सुपारी, फळं, खारीक, बदाम ठेवा.

तेलवात करुन पाट किंवा चौरंगाजवळ समई ठेवावी.

प्रथम सुवासिनी / कुमारिकेने स्वत: हळदकुंकू लावून घ्या. त्यानंतर घरातील देवदैवतांसमोर विडा ठेवून, हळदकुंकू आणि अक्षदा वाहा. त्यानंतर नमस्कार करुन प्रार्थना करा. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीचां आशीर्वाद घेऊन पूजेला सुरुवात करा.

यानंतर दिवा -धूप, उदबत्ती , दाखवून आणि नैवेद्य अर्पण करुन वेगवेगळ्या प्रकारची पाने, फुले वाहून पूज करावी. पुजा करताना शंकराचे ध्यान करावे.

पुजा सांगण्यासाठी आलेल्या ब्राम्हणांचा आदर करुन , माता पार्वती आणि शंकराला तीनवेळा नमस्कार करावा.

उत्तर पुजा

या व्रतामध्ये हरितालिकेच्या उत्तरपुजेची सुरुवात सकाळी होते. ही पुजा सकाळी लवकर करुन आरती केली जाते. सकाळी या पुजेला दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो. यानंतर हरितालिकेच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आई अन् मुलानं १३ व्या मजल्यावरून उडी मारली; पती झोपलेला असताना आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमधून माहिती उघड

GK: शिंकताना डोळे आपोआप का मिटले जातात? जाणून घ्या कारण

Shocking : तलाठ्याचा धक्कादायक प्रताप, पेन्शनच्या फाईलवर सही करण्यासाठी चक्क बियर बारच्या बिलाची मागणी

नगमासोबतच शुभी जोशीला डेट? 'Bigg Boss 19'च्या स्पर्धकावर 'प्रेमात धोका' दिल्याचा आरोप, वाचा नेमकं प्रकरण काय?

Gujarat Fire:काळाकुट्ट धूर, आगीचे उंच लोळ; गुजरातमध्ये कारखान्यात भयंकर आग, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT