Relationships Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Relationships Tips: न लाजता न घाबरता 'या' गोष्टींवर पार्टनरशी बोला खोटं; नात्यात अथांग सागरासारखं प्रेम वाढेल

Harmless Lies for Strong Relatioship: खोटं बोलणे पूर्णत: चूक नाही. मात्र खोटं कधी आणि कुठे बोललं पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीला समजलं पाहिजे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खोटं बोलण्याच्या काही ट्रिक्स सागंणार आहोत.

Ruchika Jadhav

Tips For Strong Relatioship: कधीही खोटं बोलू नये या विचाराने सर्व व्यक्ती आयुष्य जगतात. त्यात जर पती आणि पत्नीचं नातं असेल तर दोघांनी देखील एकमेकांशी कायम सत्य बोलणे अपेक्षित असते. पार्टनरसोबत खोटं बोलणे म्हणजे त्याला फसवणे असे होते. खोटं बोलल्याने आजवर अनेक नाती तुटली आहेत. खोटं बोलणे पूर्णत: चूक नाही. मात्र खोटं कधी आणि कुठे बोललं पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीला समजलं पाहिजे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खोटं बोलण्याच्या काही ट्रिक्स सागंणार आहोत.

पार्टनरशी आम्ही सांगितलेलं खोटं बोलल्याणे तुमचं नातं आणखी छान रंगेल आणि नात्याला बहर येईल. तसेच तुमच्यामध्ये कधीही कोणत्याही कारणावरून वाद होणार नाहीत.

मित्रांसह असताना

मित्रांसह असताना प्रत्येकाला एन्जॉय आणि मजा मस्ती करावी वाटते. आता यामध्ये पत्नी किंवा पतीशी बोलण्याचा फार कंटाळा येतो. मात्र अशावेळी तुम्ही स्वत:हून न चुकता पार्टनरला कॉल केला पाहिजे आणि मला तुझी आठवण येत आहे असं खोटं बोललं पाहिजे. हे ऐकून पार्टनरला तुमच्याबद्दल आणखी छान आणि स्पेशल फिल होईल.

न आवडणारे मित्र

आपल्या पार्टनरच्या आयुष्यात अनेक मित्र आणि मैत्रिणी असतात. यातील काही जण आपल्याला आवडत नाहीत. तर काही जण अगदीच मस्करी करणारे आणि काहीही खोटं बोलणारे वाटतात. तुम्हाला सुद्धा पार्टनरचे असे मित्र आवडत नसतील तरी देखील खोटं बोला आणि तुझे मित्र किती चांगले आहात असं सांगा. यामुळे पार्टनरला तुमच्याबद्दल आणखी आदर वाढेल.

आई वडील

अनेक कपल्समध्ये आई-वडिलांवरून वाद होत असतात. मुलगी असो अथवा मुलगा दोघांना एकमेकांचे आई-वडील जास्त आवडत नाहीत. त्यामुळे अशावेळी पार्टनरशी खोटं बोला. तुझे आई बाबा फार छान आहेत असं सतत सांगत राहा. आई बाबा चांगले आहेत असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या पार्टनरला स्वत:हून समजते की आपले आई-वडील पार्टनरला त्रास देत असून तो किंवा ती त्यांचा आदर करते. त्यामुळे पार्टनर कायम तुम्हाला आई वडिलांशी वाद सुरू असताना तुमच्या बाजून उभा राहिल.

जेवण

पार्टनरमध्ये बऱ्याचदा महिला जेवण बनवतात. कधी कधी जेवण बनवत असताना अचानक पर्थात मीठ किंवा तिखट जास्त जातं. असे झाल्यावर जेवणाची पूर्ण चव बिघडते. अशावेळी पार्टनरशी खोटं बोला. जेवणाची चव आवडली नाही तरी जेवण छान बनवलं आहे असं सांगत राहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT