Happy Mother's Day  Saam Tv
लाईफस्टाईल

Happy Mother's Day : साधी भोळी माझी आई... मातृदिनानिमित्त आईला पाठवा खास शुभेच्छा !

Mother's Day Celebration : आई आपल्या जीवनातील अशी एक व्यक्ती आहे जिच्यामुळे माणसाचं या जगात अस्तित्वं आहे.

कोमल दामुद्रे

Mother's Day Quotes : दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. पाहायला गेले तर आईचा कोणताच दिवस नसतो. तिच्यासाठी प्रत्येक क्षण हा खास असतो. कारण आई आपल्या जीवनातील अशी एक व्यक्ती आहे जिच्यामुळे माणसाचं या जगात अस्तित्वं आहे.

उद्या जगभरात प्रत्येक ठिकाणी मातृदिन (Mother's day) साजरा केला जाईल अशा परिस्थितीत मदर्स डे च्या निमित्ताने आम्ही आपल्याला काही शुभेच्छा आणि संदेशांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही आईला पाठवू शकता आणि तिला मदर्स डे Mother's Day Wishes 2023 च्या प्रेमळ शुभेच्छा देऊ शकता.

1. आई माझा गुरू

आई माझे कल्पतरू,

आईचे प्रेम (Love) आकाशाहून मोठे

आणि सागराहूनही खोल आहे.

– साने गुरूजी

2. आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी

औषधावर दिलेली लिमलेटची गोळी

आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखर खडा

शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा

आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात

मेतकूट कालवलेला मऊ तूपभात

आई म्हणजे देव्हाऱ्यातले लक्ष्मीचे चित्र

सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र

- शांता शेळके

Happy Mother's Day

3. आई एक नाव असतं

घरातल्या घरात (Home) गजबजलेलं गाव असतं!

सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही

आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही

– फ.मुं. शिंदे

4. आई एक उत्तम शिक्षिका असते. तीच आपले सर्वस्व घडविते.

-बाबा आमटे

5. चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई

गोठय़ात वासरांना या चाटतात गाई,

वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही

पाहून अंतरात्मा व्याकूळ मात्र होई,

नोहेचि हाक माते मारी कुणी कुठारी

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!

- कवी यशवंत

Happy Mother's Day

6. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वराचा संगम म्हणजे आई

– गीतकार शांताराम नांदगावकर

7. आई ही एकच अशी व्यक्ती आहे

जी इतरांपेक्षा नऊ महिने अधिक तुम्हाला ओळखत असते

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

8. तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे

आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे!!!

मदर्स डे च्या निमित्ताने फक्त माझे तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करत आहे

आई कायम हसत राहा

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Mother's Day

9. ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी

तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

10. तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी

कसे हे फेडू ऋण तुझे, असंख्य जन्माचा कृतज्ञ मी

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं, उडाला मोठा भडका; परिसरात काळेकुट्ट धुरांचे लोट; अपघाताचा थराराक VIDEO

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

SCROLL FOR NEXT