Newly Motherhood Health Tips: आई होणं हे जगातील सगळ्यात मोठ सुख आहे. खरेतर बाळ जन्माला आलं की, स्त्रीचा दुसरा जन्मचं असतो. यानंतर तिचे खरेतर आईच्या रुपात रुपातंर होते. तिचे सारे लक्ष तिच्या बाळापाशी असते. परंतु, नुकत्याच झालेल्या आईला स्वत:कडे लक्ष देता येतं नाही त्यामुळे अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो.
नवीन झालेल्या आईला शारीरिक व मानसिक (Mental Health) समस्यांना सामोरे जावे लागते. आई होण्याचा हा काळ खूप कठीण असतो. अशावेळी कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो हे जाणून घेऊया
1. ब्रेस्ट पेन
नवजात बाळाला (baby) आईचे दुधच पाजावे असा सल्ला दिला जातो. काही वेळेस बाळाला दूध पाजताना आईला अधिक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे अशावेळी या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी तुम्ही बर्फ लावू शकता. तसेच डॉक्टरांचा (Doctor) सल्ला देखील घेऊ शकतो.
2. थकवा
नुकत्याच जन्मलेल्या बाळामुळे आईला वेळेवर झोप मिळत नाही. त्यामुळे सतत थकल्यासारखे वाटते. आळस चढतो अशावेळी त्यांना जास्त प्रमाणात कॅलरीजची गरज असते. त्यांनी आपल्या आहारात उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करणे. जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे. पालेभाज्या व फळांचा समावेश अधिक प्रमाणात करा
3. चिंता
या काळात आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स बदल होतोत. यामुळे त्याचा मूड सतत बदलत राहातो. अशावेळी मानसिक त्रास कमी घ्यायला हवा. आनंदी राहायला हवे. तणाव टाळण्यासाठी पुरेशी विश्रांती देखील घ्यायला हवी.
4. केस गळती
बहुतेक वेळा नवीन झालेल्या आईना केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. ही समस्या काहीवेळस महिनाभर असू शकते किंवा वर्षभर देखील. अशावेळेस अधिक प्रमाणात जीवनसत्त्वे व प्रोटीनचा आहारात समावेश करावा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.