Happy Fathers Day Quotes 2023  Saam tv
लाईफस्टाईल

Happy Fathers Day Quotes 2023 : फादर्स डे निमित्त आपल्या बाबांना याप्रकारे द्या शुभेच्छा !

Fathers Day Quotes : यंदा हा दिवस १८ जूनला साजरा केला जाणार आहे.

कोमल दामुद्रे

Happy Fathers Day Wishes : आई घराच मांगल्य असते तर बाबा घराच अस्तित्व. दोघेही घराचा भक्कम कणा. पालक म्हणून ते मुलांसाठी कुठेच कमी पडत नाही. मुलींचे सगळ्यात लाडके कोणी असेल तर ते बाबा.

दरवर्षी फादर्स डे हा जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात साजरा (Celebrate) केला जातो. यंदा हा दिवस १८ जूनला साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने आपण आपल्या वडिलांसाठी काही खास शुभेच्छा पाठवून त्यांना खुश करु शकता.

1. माझ्या वडिलांनी मला कसं

जगायचं शिकवलं नाही

पण त्यांना बघून मी जगायला शिकलो

हॅपी फादर्स डे

2. कसं जगायचं आणि कसं वागायचं

हे तुम्ही शिकवलं आणि त्यामुळेच

आज या जगात जगायला शिकलोय

हॅप्पी फादर्स डे

3. कितीही अपयशी झाल्यावरही

विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती

असतो तो म्हणजे बाबा (Father)

4. आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत

पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,

म्हणूनच ते सहन करण्याची ऊब येत आहे

फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा

5. ज्यांनी माझं स्टेटस निर्माण केलं,

त्या वडिलांना या स्टेटसमधून (Status) लाख वेळ दंडवत!

हॅप्पी फादर्स डे बाबा...

6. मला आज पर्यंतची सर्वात मोठं गिफ्ट देवा कडून मिळालेली आहे,

त्यांना मी बाबा म्हणतो,

तुमचे पुरेसं आभार मानू शकत नाही,

तुम्ही मला भरपूर प्रेमाने आनंदायी आयुष्य दिल आहे,

हॅप्पी फादर्स डे बाबा...

7. बाबांचा मला कळलेला अर्थ

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर,

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारे मन,

स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन,

मुलांसाठी झटणारे अंतःकरण

Happy Fathers Day

8. तुमच्यासारखा पिता देवाकडून

मिळालेली देणगी आहे बाबा

तुमच्या आशीर्वादाबद्दल मी आभारी आहे

हॅपी फादर डे बाबा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ₹१५०० कायमचे बंद, राज्यातील १० लाख लाडकीचे अर्ज बाद, यादीत तुमचेही नाव नाही ना?

Shocking: १३ वर्षांच्या मुलीचं अपहरण, ३ दिवस घरात डांबून ठेवत बलात्कार, VIDEO बनवत...

Horoscope Tuesday Update : जोडीदाराचे म्हणणे आज ऐकाचं, धनलाभ होईल; वाचा आजचे राशीभविष्य

डान्स तर असा की... खुद्द नोराही खुश झाली असती; पाहा तरुणाचा भन्नाट व्हिडिओ

Sambhaji Nagar: शिक्षकाविना शाळा! सरकारी शाळेत फक्त दोनच शिक्षक; विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता

SCROLL FOR NEXT