Boondi Recipe  Saam TV
लाईफस्टाईल

Boondi Recipe : मिठाईच्या दुकानात मिळते तशीच रसरशीत, गोड आणि सुटसुटीत बुंदी; घरच्याघरी बनवणं अगदी सोपं, वाचा रेसिपी

Halwai Style Boondi Recipe : बुंदी गोड आणि सुटसुटीत असली पाहिजे तरच तिची चव फार छान लागते. आता अशी मिठाईच्या दुकानात मिळणारी बुंदी घरच्याघरी बनवणे देखील अगदी सोपं आहे.

Ruchika Jadhav

बुंदी आणि त्यापासून बनवलेले लाडू तसेच रायता चवीला फार छान लागतात. बुंदीची चव इतकी वेगळी असते की ती सतत खावीशी वाटते. तुम्हाला सुद्धा बुंदी खाणे फार आवडत असेल. लग्नकार्यात गावी आजही अनेक ठिकाणी गोड म्हणून बुंदी विकली जाते. बुंदी गोड आणि सुटसुटीत असली पाहिजे तरच तिची चव फार छान लागते. आता अशी मिठाईच्या दुकानात मिळणारी बुंदी घरच्याघरी बनवणे देखील अगदी सोपं आहे. ते कसं त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

बुंदी बनवण्याची ट्रिक

साहित्य

बेसन पीठ

पाणी

तेल

कृती

बुंदी बनवण्यासाठी साहित्य फार कमी लागतं. फक्त याची परफेक्ट रेसेपी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सर्वात आधी एका भांड्यात दोन कप बेसन पीठ घ्या. बेसन पिठात तुम्हाला हवे तसे आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करा. पाणी मिक्स केल्यावर तुम्ही यामध्ये एकतार पडेल इतकंच पाणी घ्या. त्यानंतर या मिश्रणात एक चमचा तेल सुद्धा मिक्स करा.

मिश्रण तयार केल्यावर एका पॅनमध्ये तेल तापण्यासाठी ठेवा. तेल छान तापलं की गॅस कमी करा. त्यानंतर एक थावर किंवा एक असं भाडं घ्या ज्याला खाली छोटे छोटे छिद्र आहेत. थावर कढईतील तेलात बुडवू नका. कारण यातून आपल्याला बुंदी पाडायची आहे. त्यामुळे तेलात बुंदी पाडण्यासाठी वेगळा आणि बुंदी काढण्यासाठी वेगळा थावर वापरा.

तेल छान गरम झालं गॅस आधी कमी करा आणि मग यात थावरच्या मदतीने बुंदी पाडा. बुंदी तेलाच सोडताना तेल जास्त गरम किंवा अगदीच थंड सुद्धा नसावे. बुंदी टाकल्याबरोबर ती तळाला न जाता वरती तरंगली पाहिजे इतकं तेल गरम असावं. अनेकदा तेलाचं तापमान कमी असल्याने बुंदी कढईत सरळ तळाला जाते. तसेच तेल जास्त तापले असेल तर बुंदी वरून करपलेली आणि आतून कच्ची राहू शकते.

त्यामुळे यासाठी बुंदी तेलात टाकल्याबरोबर गॅस कमी करा. यामुळे बुंदी कढईमध्ये खाली बसणार नाही. शिवाय बुंदी तेलाच छान तळली जाईल आणि छान तळून निघेल. तुम्ही बुंदीला छान रंग यावा यासाठी यामध्ये विविध रंग सुद्धा मिक्स करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT